“नो मास्क, नो पेट्रोल-डिझेल” ; देशभरात नवा नियम लागू

0

नवी दिल्ली : देशभरातील अनेक जिल्ह्यांत २० एप्रिलपासून लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यांवर वाहनांची संख्या देखील वाढेल. अशात देशामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आजपासून पेट्रोल पंपावर मास्क लावल्याशिवाय पेट्रोल-डिझेल मिळणार नाही, अशी माहिती पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजय बंसल यांनी दिली आहे. हा निर्णय पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून घेण्यात आला आहे. हा निर्णय देशभरात लागू होणार आहे. लॉकडाऊन दरम्यान पेट्रोल पंपांचा समावेश आवश्यक सेवांमध्ये करण्यात आला आहे.

देशामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून देशभरातील कोरोनाबाधितांचा आकडा १७ हजार पार झाला आहे. अशात कोरोनाचे संक्रमण नसलेल्या जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यांवर गाड्यांची रहदारी वाढेल. याच दरम्यान पेट्रोल पंपावर काम करणारे कर्मचारी आणि नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता ‘नो मास्क, नो पेट्रोल-डिझेल’ ही रणनीती आखली जात आहे.

पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी येणाऱ्यांना मास्क घालणे अनिर्वाय आहे. ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने एकमताने हा निर्णय घेतला आहे. जर कोणी मास्क न लावता पेट्रोल-डिझेल भरण्यास आले तर त्यांना पेट्रोल-डिझेल दिले जाणार नाही, असे असोसिएशनने सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.