नगराध्यक्ष व मुख्याधिकारी झाले हुकूमशाह ; नगरसेविका शशी कोलतेचा आरोप

0

वरणगाव    नगर परिषेदेचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी हे शहरातीत नागरिकाच्या भावनेशी खेळत असुन शहरातील नागरिकाना भेडसवनाऱ्या पाणी पुरवठ्या बाबत राजकारण करीत असुन सतत महा विकास आघाडीच्या सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप नगराध्यक्ष यांच्या सहकारी नगरसेविका शशी कोलते यांनी लेखी निवेदनाद्वारे केले

संपूर्ण देश कोरोना विषाणूशी झुंज देत आहे,अशा परिस्थितीत सुद्धा नगराध्यक्ष राजकारण करणे काही थांबवत नाहीये,महाविकास आघाडी सरकार वर सतत आरोप करत आहेत की 24 तास पाणी योजनेवर स्टे आणला,अहो जी साडे 13 कोटींची पाणी पुरवठा योजना दिली त्याचा तर बट्ट्याबोळ करून ठेवला,शासनाच्या निधी विनाकारण वाया केला गेला, कारण लोकांना 4 ते 5 दिवसाआड सुद्धा पाणी पुरवठा देऊ शकत नाहीये,गावात एक टाकी होती तेव्हा 2 दिवसाआड पाणी पुरवठा नंतर जॅकवेल व सम मकरंद नगर टाकी तेव्हा 6 ते 7 दिवसाआड पाणी,बघा काय नियोजन आहे,शासन एवढा खर्च नागरिकांना नियमित पाणी मिळण्यासाठी करते पण काळे यांनी स्वतःच्या निष्क्रिय तेचे पांघरून नागरिकांवर फेकले आहे, पाणीपुरवठा समितीची बैठक 17 ला पार पडली ,पण या बैठकीत एकही नगरसेवक उपस्थित नव्हते कारण कुणाला बोलवलेच गेले नव्हते,बैठकीत काय ठरले हे दवंडी मार्फत 18 एप्रिल ला नागरिकांसोबत नगरसेवकांना सुद्धा कळले,त्यात 3 दिवसाआड 2 तास पाणी देण्याचे आश्वासन देण्यात आले,मोटर लावल्यास 500 रु दंड ,म्हणजे बकेट ने पाणी भरावे असे आव्हान लोकांना केले गेले.

माझ्या वार्ड क्र 9 मध्ये पाणी पुरवठ्याचे 6 भाग आहेत,प्रत्येकी 70 ते 80 कनेक्शन आहेत,मकरंद नगर ची टाकी साधारण 1 कि. अंतरावर आहे,मेन लाईन 4 इंची आहे तर कनेक्शन 1/2 इंची,आता आपण विचार करू शकता की 80 घरांना काय प्रेशर ने पाणी मिळेल,3 दिवसाचा साठा 2 तास विना पंप पाणी कसे भरु शकतील नागरिक?

काळे यांना तांत्रिक ज्ञान नसेल पण कमीत कमी पाणी पुरवठा अभियंता तसेच मुख्याधिकारी यांनी तरी विचारपूर्वक निर्णय घ्यायला हवा होता,बैठकीत फक्त नागरिकांवर कारवाई होईल असे ठरले पण कर्मचारी पाणी सोडल्यावर त्याच भागात फिरतील, प्रत्येकाला पाणी येतंय की नाही याची शहानिशा करतील जर येत नसेल तर त्यावर उपायजोजना करतील,रजिस्टर मेंटेन करतील ,त्यावर स्थानिक नगरसेवक व 4 ते 5 सुरुवातीचे घरे तसेच शेवटचे घरे यामधील लोकांच्या सह्या घेतील आणि जो कर्मचारी असे करत नसेल त्याच्यावर कारवाई होईल,बैठकीत असे काहीही ठरले नाही मात्र नागरिकांवर अनेक निर्बंध लादले गेले,खर तर यांना नियोजन जमत नाही,म्हणजे 2 तास पाणी फक्त बघायला मिळेल ,घरात वापरण्यासाठी मात्र भांडी रिकामी राहतील,कारण  नागरिक विना पपं पाणी भरुच शकणार नाही,एकही घर असे सापडणार नाही ज्यांच्याकडे मोटर नाही, घरपरत प्रत्येकाने गच्चीत टाकी ठेवून पाईप लाईन केलेली आहे,मग का बादली ने वरच्या टाक्या भरतील?जग किती पुढे चालले आहे आणि हे 50 वर्षांपूर्वी सारख बादली ने पाणी भरायला सांगत आहेत. आणि जरी भरले तरी 3 दिवस पुरेल एवढा साठा होईल का?कितीतरी म्हातारे नागरिक आहेत ज्यांनी 60 ठी ओलांडली आहे,तर काहींनी 40 शी ओलांडली आहे,कोव्हिडं 19 च्या ऐवजी अशा बिनविचारी निर्णयाला लोक बळी पडून आजारी पडतील.खरोखर मुख्याधिकारी पाणी पुरवठा अभियंता व नगराध्यक्ष यांनी गावाला 50 वर्षे मागे नेले आहे अशी मी खंत व्यक्त करते.

Leave A Reply

Your email address will not be published.