वरणगावात करवाढी विरोधात भाजपाचा जन आक्रोश मोर्चा

0

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

नगरपरिषद प्रशासनाचे नागरिकाच्या मालमत्तेवर व इतर कर वाढीच्या नोटीसा पाठविल्याच्या विरोधात भाजपाने तिसऱ्या वेळेस जन आक्रोश मोर्चा काढीत  हे कर रद्द करण्याची मागणीचे निवेदन मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

नगर परिषद प्रशासकीय राजवटीत नागरिकाच्या मालमत्ता किमतीच्या आधारे व ज्या सेवा मिळत नाही अशाचाही वाढीव कर लागू करण्यासाठी नोटीसा बजावण्यात आल्या असल्याने, या अवाजवी वाढीव कर लादत असल्याने विविध राजकीय पक्षाने वाढीव कर रद्द करण्याची निवेदन देऊन मागणी केली होती.

तर याच वाढीव कर विरोधात भाजपाच्या वतीने यापुर्वी नगर परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते.

तर दि ७ मंगळवार रोजी स्वाक्षरी मोहीम राबवित जन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता, तरीही प्रशासनाने यांची दखल न घेतल्याने मंगळवार दि १४ रोजी जगदबा नगर येथून जन आक्रोश मोर्चा काढीत नगर परिषद कार्यालयावर धडक देऊन मुख्याधिकारी शे समीर यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात नागरिकाच्या मालमत्तेच्या किमंतीनुसार आकारण्यात येणारा कर रद्द करवा, शैक्षणीक कर, वृक्ष संवर्धन कर, अग्नीशमन कर, घनकचरा प्रकल्प कर, शौचालय कर अशा सुविधा नागरिकांना मिळत नसल्याने हा कर आम्ही भरणार नाही, असे सदर निवेदनात दिले आहे.

मोर्चाचे नेतृत्व सुनिल काळे, शे अखलाख शे युसुफ, सुनिल माळी, प्रणिती  पाटील यांनी केले.  यावेळी शे अल्लाउद्दीन शेठ, मुस्लीम अन्सारी, अजय पाटील, गजानन वंजारी, ए. जी. जंजाळे, संभाजी देशमुख, रमेश पालवे, सुभाष धनगर, मयुर गावंडे, हितेश चौधरी, अशोक माळी, दिपक चौधरी, संगीता माळी, छोटू सेवतकर, विक्की चांदेलकर, इरफान पिंजारी, डॉ. नाना चांदणे, नटराज चौधरी, ज्ञानेश्वर घाटोळे, आदीसह मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.