लोहारा कन्या शाळेत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन 

0

लोहारा दि.१६-

  जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलींची शाळा लोहारा येथे इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलींचा बाल आनंद मेळावा घेण्यात आला. या बाल आनंद मेळाव्यात कन्या शाळेतील मुलींनी भाजीपाल्याची, खेळणीची, फरसाण, भेळ,  उसळ,  चहा सरबत, मठ्ठा, आइसक्रीम,  चॉकलेट, बिस्किट, पाणीपुरी, कचोरी, वडापाव, कटलरी ,बोर उकळलेल्या विविध शेंगा अशा विविध प्रकारच्या १६० दुकानी मांडल्यामुळे शाळेच्या आवारास बाजार भरल्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.

कन्या शाळेतील मुलींना प्रत्यक्ष गणितातील व्यवहारज्ञान व्हावे, नफा तोटा गणिताचा प्रत्यक्ष अनुभव, बेरीज -वजाबाकी गुणाकार भागाकार याव्हे ज्ञान व्हावे यासाठी या मेळाव्याचेआयोजन करण्यात आले होते. मुलींच्या या किलबिल बाजाराला भेट देण्यासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक व पालकांनी सहभाग घेतला. मुलींजवळ जाऊन त्यांनी मांडलेल्या वस्तू व माल विकत घेऊन पैशाचा व्यवहार कसा होतो याचा प्रत्यक्ष अनुभव यामुळे त्या मुलींना मिळाला. बाल आनंद मेळाव्यात मांडलेल्या दुकानांपैकी इयत्ता चौथीतील कीर्ती शंकर गोराडे या मुलीने कचोरी विकून पाचशे रुपयांची विक्रमी विक्री केली. त्याचप्रमाणे इयत्ता पहिलीतील रुचिता कैलास चौधरी या मुलीने सुद्धा हरभरा उसळ विकून चारशे रुपयांची विक्री केळी. जवळजवळ बाल आनंद मेळाव्यातून साधारण सर्व मुलींची तीस हजारांपर्यंत विक्री झाली. या बाल आनंद मेळाव्याला भेट देण्यासाठी लोहारा केंद्राचे केंद्रप्रमुख मा. बाबुराव धुंदाले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद देशमुख , सदस्य प्रभाकर चौधरी, अजय वारुळकर, सीमा खाटीक, वैशाली परदेशी त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्या अनिताताई चौधरी, आशाताई चौधरी, रमेश शेळके, चंद्रकांत पाटील, दीपक पवार व पटेल त्याचप्रमाणे गावातील माता पालक शिक्षणप्रेमी मंडळी, गांवकरी मंडळी उपस्थित होती. शाळेत बाल आनंद मेळाव्याचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी अर्जुन बारबन्द, साळी मॅडम, महाजन मॅडम, पाटील मॅडम, निकम सर, तपाने सर, गजानन काटे, समाधान माळी सर यांनी केले. सर्व पालकांनी व गावकऱ्यांनी बाल आनंद मेळाव्याचे कौतुक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.