तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात लोहारा शाळेचे यश

0

लोहारा दि.१६-

पाचोरा तालुक्यातील 44 वे विज्ञान प्रदर्शन पाचोरा शहरातील गुरुकुल इंग्लिश मेडिअम शाळेत घेण्यात आले. या प्रदर्शनासाठी लोहारा जि.प. मराठी मुलांची शाळा मधील प्रथमेश पुरुषोत्तम सुर्वे याने अग्निशमन यंत्र, सुमित सुनील क्षीरसागर, ऋषभ प्रदीप क्षीरसागर यांनी जैविक शेती हे साहित्य बनवले होते. यांना वर्गशिक्षक अविनाश शिंदे यांनी मार्गदर्शन केले होते.  जि. प मराठी मुलींची शाळा लोहारा मधील इयत्ता चौथीतील यशस्विनी चंदनसिंग राजपूत व कल्याणी शरद देशमुख या मुलींनी गणितातील संख्याज्ञान  व विस्तारित रूप  या विषयावर शैक्षणिक साहित्य बनवले होते .प्राथमिक लोकसंख्या शिक्षक गटात कृष्णा आत्माराम तपोने यांनी जीवनातील आव्हानांवर वैज्ञानिक उपाय या विषयावर 100 दिवस संस्कार मोती या उपक्रमांअंतर्गत मुलाचा नैतिक मूल्यांचा विकास करून सक्षम पिढी कशी तयार करता येईल की जेणे करून भविष्यातील आवाहनाना हीच पिढी लढू शकेल. प्राथमिक शैक्षणिक साहित्य गटात विलास अरुण निकम यांनी गणित विषयावर गणिती क्रिया शिकवण्यासाठी गणिती बहुउपयोगी शैक्षणिक साहित्य बनवली होती. या सर्व साहित्य पैकी निकम विलास अरुण यांचा शैक्षणिक साहित्य गटातून पाचोरा तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळाला त्यांची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवळ झाली त्यांना पाचोरा तालुक्याचे नायब तहसीलदार संभाजी पाटील, गटशिक्षणाधिकारी विकास पाटील, शिक्षण विस्ताराधिकारी जितेंद्र महाजन, समाधान पाटील, सरोज गायकवाड, लोहारा केंद्रप्रमुख बाबुराव धुंदाळे, यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरवविण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.