लोक अदालतीमध्ये ४ हजार ७७३ प्रलंबित, वादपूर्व प्रकरणे निकाली

0

जळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित असलेली ३ हजार ९०६ दाखलपुर्व, ८६७ न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये निकाली काढण्यात आली. यामध्ये २१ कोटी ९७ लाख रुपयांची नुकसान भरपाईचे आदेश दिले. विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवारी जिल्हा न्यायालयात तसेच सर्व तालुका न्यायालय, कौटुबिक न्यायालय, औद्योगिक न्यायालय, कामगार न्यायालय, – सहकार न्यायालय येथे राष्ट्रीय लोक अदालत झाली. – दि.४ ते दि.८ डिसेंबरपर्यंत राबविण्यात आलेल्या स्पेशल ड्राईव्हमध्ये एकूण ६१९ प्रकरणे निकाली काढण्यात आली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.क्यू. एस.एम. शेख यांचे लोकअदालतसाठी मार्गदर्शन लाभले. सदर लोकअदालतमध्ये जिल्हा न्यायाधीश यांचे सहकार्य लाभले. जिल्हा न्यायाधीश-१ एस. एन. राजूरकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव एस. पी. सय्यद, जिल्हा वकिल संघांचे अध्यक्ष

अॅड. केतन ढाके, जिल्हा सरकारी

वकील अॅड. सुरेंद्र काबरा, पॅनल न्यायाधीश बी. एस. वावरे, न्या. एस. व्ही. केंद्रे, न्या. एम. एस. बडे, न्या. एस. एस. घारे, न्या. पी. आर. वागडोळे, न्या. एम. पी. जसवंत, लोकअभिरक्षक कार्यालय प्रमुख अॅड. अब्दुल कादीर, उप मुख्य लोकअभिरक्षक मंजुळा मुंदडा व त्यांचे सहकारी, पॅनल अॅड. पूनम चौधरी, अॅड. हेमंत गिरनारे, अॅड. श्रध्दा सोनवणे, अॅड. प्रीती नागलकर, अॅड. संदीप पाटील, अॅड. लीना म्हस्के, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यालयीन अधीक्षक सुभाष पाटील, आर. के. पाटील, प्रमोद ठाकरे, गणेश निंबोळकर, हर्षल नेरपगारे, जयश्री पाटील, संगीता पाटील, आर. के. साळुंखे, प्रकाश काजळे, जावेद पटेल, जितेंद्र भोळे, समांतर विधी सहायक सचिन पवार यांनी परिश्रम घेतले.

न्यायाधीश स्वतः आले खाली पक्षकार मोटार अपघातात अपंग झाल्याने वरील

मजल्यावर येऊ शकत नव्हता. त्यावेळी तदर्थ जिल्हा न्यायाधीश एस. व्ही. केंद्रे हे स्वतः दोन मजले खाली उतरुन जखमी पक्षकारासोबत प्रकरणाची विचारणा करुन विमा कंपनीसोबत असलेले प्रकरण चार लाख रुपयांची तडजोड करून निकाली काढले.

महावितरणचे १९ लाखांच्या बिलाचा मिळाला परतावा बालाजी इरिगेशन व महावितरण कंपनी जळगाव विभाग यांच्यामध्ये राष्ट्रीय लोकअदालतील वाद पूर्व प्रकरण सह दिवाणी न्यायाधीश एम. पी. जसवंत यांच्या पॅनल समक्ष निकाली काढले. यात बालाजी इरिगेशन यांना महावितरण कंपनीचे थकीत बिल १९ लाख २१ हजार ६६२ परतावा करुन निकाली काढले.

Leave A Reply

Your email address will not be published.