लोकसभेचे सर्वच उमेदवार करोडपती

0

नामनिर्देशनात पतीपत्नींच्या नावे मालमत्ता विवरणपत्रात माहिती ः पाच वर्षात पाच पटीने वाढ

जळगांव-
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे सादर केलेले शपथपत्रात त्यांनी धारण करीत असलेल्या गुंतवणूक, स्थावर, जंगम मालमत्तां या कोटयांवधींची असून आयकर विवरण पत्रातुन गेल्या पाच वर्षात किमान पाच पटीत उत्पन्न वाढ झाल्याचे दिसते.
लेाकसभेसाठी विद्यमान खा. रक्षा खडसे यांनी निवडणूक आयोगाकडे वारस हक्कानुसार मिळकतीत दोनही मुले गुरूनाथ व रिषीका यांचे नावे समावेश असलेली मालमत्ता रूपये 17 लाख 32 हजार रोख, ठेवी,गुंतवणूक व शेअर्स मालमत्ता मुल्य 10 कोटी पैकी चार कोटी 57 लाख, तीन हजार 533 मुलगी रिषीका दोन कोटी 56 लाख व गुरूनाथच्या नावे प्रत्येकी दोन कोटी 95 लाख,सह पेट्रोल पंप,शेतजमीन, पवई व नाशिक येथे प्लॉट, फ्लॅट, मालमत्ता, तसेच रक्षा खडसेंच्या नावे 3 कोटी 9 लाख,रिषीका 2 कोटी 4 लाख,78 हजार गुरूनाथ 2 कोटी 4 लाख 78 हजार असे मालमत्ता धारण करीत असल्याचे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
आ.स्मिता वाघ यांनी 29 रोजी दाखल करीत असलेल्या उमेदवारी पत्रात ते कला मानसशास्त्र शाखेत पदवीधर असून सोबत पतीपत्नीच्या नावे सन 2013-14 चे वार्षिक उत्पन्न 4 लाख 2 हजार 635 रूपये, तर गत 2017-18 च्या उत्पन्नात 20 लाख 92 हजार 635 रूपये तर त्यांचे पती उदय वाघ यांचे 2013-14 चे 2लाख 84 हजार955 वार्षिक उत्पन्न तर 207-18 मधे 6 लाख 13 हजार 379 असे वाषिक उत्पन्न आहे यासह स्थावर मिळकतीत जळगांव येथे घर वरद ऑफसेट प्रेस, प्लॉट, सायन -वांद्रे (मुंबई),कोथरूड पुणे येथे फ्लॅट, प्लॉट, इनोवा, स्कार्पीओ,इटीऑस व वेस्पा अशी वाहने. तर 6 लाख 10 हजार 219 रू.रोखसह ठेवी, विमा, वित्तिय संस्था गुंतवणूक सह 25 लाख,54 हजार,150 रू मालमत्ता स्मिता वाघ यांच्या नावे व 14 लाख 72 हजार 610 रू मालमता,उदय वाघ यांच्या नावे आहे. घर,प्लॉट शेतजमीन असे 2 कोटी 71 लाख 46 हजार 982 रूपये स्मितावाघ यांच्या नावावर असून 1 केाटी 2 लाख 78 हजार 770 रूपये मालमत्ता उदय वाघ यांच्या नावावर असल्याचे शपथपत्रात नमुद केले आहे.
तिसरे उमेदवार गुलाबराव देवकर हे कर्जदार असून देवकरांची पत्नी मात्र श्रीमंत लखपती आहेत. देवकरांकडे जिवन विमा पॉलीसीचे 12 लाख 40 हजार व 3लाख 60 असे 16 लाखांचे कर्ज आहे. छाया देवकरांच्या नावे बॅक ऑफ बडौदा 13 लाख 41 हजार 210 रूपये, विजया बँकेचे 43 लाख 78 हजार व 2 लाख 32 हजार असे सुमारे 69 लाच 52 हजार रूपयांच्या वर कर्ज आहे. 69 लाख दोन 456 रोकड ठेव,गुतवणूक असून पत्नी छाया देवकरांच्या नावे 67 लाख 51 हजार मालमत्ता त्यापैकी एक रामदास कॉलनी व द्रौपदी नगर येथे प्रत्येकी एक निवासस्थान आहे. गुंलाबराव देवकरांच्या नावे प्लॉट, शेतजमीन असे मिळून 65 लाखाची मालमत्ता व पत्नीच्या नावे तीन कोटी 18 लाखांची मालमत्ता आहे.
लोकसभेसाठी तीन जणांचे उमेदवारी अर्जा सोबत शपथपत्रात नमुद केल्यानुसार त्या उमेदवारांची मालमत्ता हि गेल्या पाच वर्षात साडेचार पाच पट वाढ झालेली दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.