पाचोरा विधानसभा मतदारसंघात 1800 कर्मचार्‍यांना इ.व्ही.एम. मशिचे प्रशिक्षण

0

पाचोरा दि.31 – 3
जळगांव लोकसभा मतदारसंघातील 18 पाचोरा – भडगांव विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र अध्यक्ष वर्ग – 1 ते 4 व शिपायांना येथील गो.से. हायस्कूल मध्ये दि. 31 रोजी 2 सत्रांमध्ये प्रशिक्षण देण्यात आले. उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील, तहसिलदार कैलास चावडे, तहसिलदार गणेश मरकड, नायब तहसिलदार उमाकांत कडनोर, निवडणूक नायब तहसिलदार संभाजी पाटील, यांनी सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत व 10 ते 12 वाजेच्या दरम्यान अशा दोन सत्रांमध्ये इ.व्ही.एम व व्ही.व्ही. पॅड मशिन हाताळणे पासुन ते मतदाराने केलेल्या आपल्या पसंतीच्या उमेदवाराला दिलेले मतदान त्याच उमेदवारास मिळाले की नाही ? याची खात्री होणार्‍या व सात सेकंदा पर्यंत मतदारास पावती दिसेल. आणि सात सेकंदानंतर ती पावती पुर्वीच सिल लावलेल्या बॉक्स मध्ये पडेल. यापुर्वी सकाळी सात वाजेच्या आत उपस्थित कर्मचार्‍यांकडुन पन्नास मतदान करुन ते पसंतीच्या उमेदवारालाच गेले की नाही ? याची खात्री उमेदवारांच्या पुलिंग एजंटांना करुन दिली जाईल. व त्यानंतरच मतदानास सुरुवात केली जाईल.अशा आषयाचे मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी गणेश मरकड यांनी सर्वांना निवडणूक कामकाजाची इत्यंभूत माहिती तसेच इ.व्ही.एम.- व्ही.व्ही.पॅड यंत्र हाताळणीचे प्रात्यक्षिक देण्यात आले.यावेळी 35 क्षेत्रीय अधिकारी तसेच निवासी नायब तहसीलदार अमित भोईटे, रमेश देवकर मुकेश हिवाळे, रमेश राजगुरू, अशोक कोल्हे यांचेसह सर्व मंडळ अधिकारी कर्मचारी, तलाठी, कोतवाल आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.