रोहीत्रामुळे रहिवाशांच्या जीवाला धोका

0

विवरे दि.११- 

रावेर तालुक्यातील विवरे येथे गेल्या काही वर्षापासुन इसराक खान यांच्यापिठाची गिरणीसमोरील विजेची डि.पी.(रोहित्र) बसविण्यात आली आहे.परंतु सदर डि.पी. ज्या ठिकाणी बसविण्यात आली आहे. त्या रस्त्यावरून दोन्ही गावांचे नागरिक येजा करतात.तसेच या हमरस्त्यावरून वाहन देखील जातात. तरी या विजेच्या डि.पी मुळे जिवितहानी होऊ शकते.याठिकाणी डीपी वर नेहमी शॉर्टसर्किट सुरूच असते.या डीपी जवळ नेहमी लहान मुले खेळताना दिसून येतात.अशा ठिकाणी गावातील मेन डि.पी.बसवण्यात आली असून यामुळे मात्र नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झालेला आहे.तरी सबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन ही जीवघेणी डीपी (रोहित्र) याठीकानाहूण दुसरीकडे हलविण्याची मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.