मारहाण व जातीवाचक शिविगाळ केल्या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल

0

यावल दि.११-

मंत्र्यांसमोर पंचायत समिती गटनेत्याच्या गावातील ग्रामपंचायत मधील गैरव्यवहार व या प्रकाराला त्यांचा वरद हस्त अशी तक्रार केली म्हणुन त्याचा राग येत एकास मारहाण व जातीवाचक शिविगाळ केल्याची तक्रार व अदखलपात्र गुन्हा यावल पोलिसात नोंदवण्यात आला आहे. तक्रारदार सुनिल नथ्थु भालेराव यांनी केली असुन कॉग्रेसचे गटनेता शेखर पाटील व त्यांच्या कुंटुंबीयांवर त्यांनी आरोप केला आहे. २९  आक्टोबर रोजी येथील पंचायत समीतीच्या सभागृहात दुष्काळी स्थितीचा आढावा बैठक पार पडली त्या प्रसंगी तालुक्यातील सौखेडासीमचे सुनिल नथ्थु भालेराव यांनी गावातील ग्रामपंचायतीच्या गलथान कारभाराची तक्रार केली व या गलथान कारभारास पंचायत समिती काँग्रेसचे गटनेते शेखर पाटील यांचा वरद हस्त असल्याचा आरोप पशुसर्वधन, दुग्धविकास व मस्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांचेकडे केला होता. तेव्हा त्या तक्रारीचा राग येवुन शेखर पाटील यांनी सुनिल भालेराव यांना शिवीगाळ करून मारहाण केली म्हणुन पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आली आहे. तथापी या गुन्हयाची हा गुन्हा अॅट्रोसीटी कलमान्वये नोंदवावा अशा आशयाची तक्रार भालेराव यांनी फैजपुर उपविभागीय अधिकारी राजेंद्र रायसींग यांचेकडे केली आहे. दि.२९ ऑक्टोंबरला सांयकाळी भालेराव गावाकडे जात असतांना शेखर पाटील यांनी रस्ता अडवत मारहाण केली व जातीय वाचक शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकीदिल्याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात या गुन्हयाची नोंद अदखलपात्र गुन्हा म्हणून करण्यात आली आहे तर हा गुन्हा अॅट्रोसीटी कायद्यान्वये दाखल करावा अशी मागणी भालेरावने निवेदनाव्दारे केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.