रेशनिंग रॅकेटचा पर्दाफाश …!

0

जळगाव जिल्ह्यातील रेशनिंग दुकानदाराच्या मनमानी कारभार सध्या गाजतोय. गोरगरीब गरजू लोकांसाठी शासनातर्फे स्वस्त दरात धान्य पुरवठा रेशनिंग दुकानदारांमार्फत केला जातो. जिल्ह्यात रेशनिंग दुकानदारांची संघटना स्थापन करून त्या संघटनेमार्फत संबंधित पुरवठा खात्यावर दबाव टाकला जातो. परंतु माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांनी पुरव्यानिहाय पर्दाफाश केला. त्यामुळे संघटनेच्या गोंडस नावाखाली चालणारे रेशनिंगवाल्यांचे रॅकेट उघडे केले त्याचा परिणाम जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सुमारे 540 रेशनिंग दुकानदारांना नोटीस बजावून त्यांची चौकशी सुरू केली.

जे रेशनिंग दुकान आपले चराऊ कुराण आहे. त्याची परवानगी रद्द झाली तर आपले काय होईल या भितीपोटी रेशनिंगच्या नावाखाली दोन नंबरचा धंदा करणारांचे धाबे दणाणले. सामाजिक कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांनी माहितीच्या अधिकारात पुरवठा खात्याकडून माहिती घेऊन उदाहरणासह ती जनतेसमोर ठेवली. इतकेत नव्हे तर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे रितरस पुराव्यासह लेखी अर्ज सादर करून त्याच्या चौकशीची मागणी केली. त्यामुळे चवताळलेले रेशनिंग दुकानदार एकवटणे. त्यांनी दीपककुमार गुप्ताचा काटा काढण्यासाठी प्रती रेशनिंग दुकानदारांकडून तीन हजार रूपये जमा करून आंदोलन केले जात आहे.

रेशनिंग दुकानांच्या संदर्भात ज्या तक्रारी आहेत. त्याबाबत विचारणा करणाऱ्या तथा चौकशी करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना रितसर त्या तक्रारींच्या संदर्भात आपला योग्य तो खुलासा देणे अपेक्षित असतांना आठवले गटाच्या आरपीआय पक्षाच्या नावाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांना जिल्ह्यातून हद्दपार करा त्यांना शासनाने दिलेले पोलिस प्रोटेक्शन रद्द करा या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनकर्त्यात आरपीआय पक्षाचे अनिल अडकमोल हे सुध्दा आहेत. अनिल अडकमोल हे जिल्हा रेशनिंग दुकानदार संघटनेचे पदाधिकारी आहेत. तसेच त्यांचे स्वत:चे दोन रेशनिंग दुकाने आहेत. वास्तविक एकाच्या नावावर एकच रेशनिंग दुकान मिळते परंतु अनिल अडकमोल यांनी एकाच कुटुंबात दोन रेशनिंग दुकाने कसे घेतले? हा खरा प्रश्‍न आहे.

अशाच प्रकारे रेशनिंग दुकानांमध्ये होणारा काळाबाजार चव्हाट्यावर आणण्याचे काम माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता हे करत असल्याने त्यांचे विरोधात आरपीआय पक्षाला हाताशी धरून आंदोलन केले जात आहे. अशाप्रकारे आपल्या पक्षाचे कार्यकते आंदोलन करून आपल्या पक्षाला बदनाम करीत आहे यांची कल्पनासुध्दा पक्षाचे प्रमुख आठवले यांना नसेल हेही तितकेच खरे.

माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी माहितीच्या अधिकारात माहिती घेवून जिल्ह्यातील अनेक प्रकरण उघडकीस आणले आहेत. दिपककुमार गुप्ता यांनी त्यांनी मिळविलेल्या माहितीमुळे स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ साधला आहे. अशी अद्यापवर तक्रार आलेली नाही. समाजाच्या हितासाठी ते सतत अग्रेसर असतात. जळगाव शहरातील शिवाजी नगर उड्डाण पूलाच्या कामाच्या दिरंगाईाबत त्यांनी अनेक वेळा आवाज उठवला. त्यामुळे शिवाजी नगरच्या पुल बांधकामाला गती मिळाली. स्वत: जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी साईटवर जाऊन पुल बांधकामाची पाहणी केली. पालकमंत्री गुलाबराव पाटील ह्यांनी सुध्दा माहिती अधिकार कार्यकर्ते गुप्तासमवेत पूल बांधकाम स्थळी जाऊन पाहणी करून ठेकेदारांना कान पिचक्या दिल्या.

रेशनिंग दुकानातून गोरगरीबांना मिळणारे स्वस्त धान्य त्यांना मिळत नसल्याच्या उदाहरण पुराव्यासह तक्रारी केल्या यात गुप्ता यांचा वैयक्तिक स्वार्थ आहे का? दोन नंबर धंदा करणाऱ्या रेशनिंग दुकानदाराकडून प्रत्येकी 3 हजार रुपये जमा करणारे रेशनिंग दुकानदार संघटनेच्या पदाधिकाऱ्याप्रमाणे बिचारे गोरगरीब लोकांकडून गुप्ता यांनी पैसे जमा करणे शक्य नाही. तेव्हा आपल्या दोन नंबरच्या धंद्यात कोणाचा अडथळा येतोय असे वाटत असेल तर त्यांचा काटा काढण्यासाठी हे रॅकेट एकत्र येतात. रेशनिंग रॅकेटवाले तेच करतात.

दिपक गुप्ता यांचे रिपब्लिकन पार्टीचे काहीही वाकडे नाही तथापि त्या पक्षाच्या माध्यमातून गुप्तांना मिळालेले पोलिस प्रोटेक्शनची मागणी करणे यामागे त्यांचा हेतू शुध्द नाही. गुप्तांचे बरे – वाईट करण्याचा त्यांचा हेतु आहे. शासनाने याची दखल घेवून गरिबांच्या नावावर लूटमार करणारे हे रेशनिंग दुकानदार प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारेच आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.