रेल्वेतुन पडल्याने नांद्रा येथील इसमाचा मृत्यू

0

पाचोरा | प्रतिनिधी 
नांद्रा ता. पाचोरा येथील इसमाचा रेल्वेतुन पडल्याने मृत्यु झाल्याची घटना दि. ३ रोजी रात्री १० वाजेच्या पुर्वी घडली. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांद्रा ता. पाचोरा येथील आनंदा देवराम पाटील वय – ३८ हे दि. ३ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास माहेजी – परधाडे  रेल्वे खंबा नं. ३८६/२०/२२ दरम्यान अप लाईनच्या बाजुला साहेबराव जयराम पाटील यांच्या शेताजवळ कोणत्यातरी रेल्वेतुन पडल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. माहेजी रेल्वे स्टेशनचे उपस्टेशन मास्तर दिनेशकुमार स्वामी यांनी सदरची माहिती पाचोरा पोलिस स्टेशनला दिल्यानंतर पाचोरा येथील रुग्णवाहिका चालक बबलु मराठे यांनी आनंदा देवराम पाटील यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणला. मयताचे शवविच्छेदन पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी केले. घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार रामदास चौधरी हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.