पाण्याचे टॅकर पलटी ; वाहनचालक जागीच ठार

0

जामनेर | प्रतिनिधी
तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत येथे रस्त्याच्या चौपदरी करण्याचा कामावर पाणी मारत असताना टॅ्क्टरसह पाण्याचे टँकर पलटी होऊन त्यात चालक ज्ञानेश्वर बळीराम पाटील वय ३२ रा.मोयगाव ता.जामनेर यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल दि.४ रोजी सकाळी ९-३० वाजेच्या सुमारास घडली.
जामनेर ते औरंगाबाद या महामार्गावरील रस्त्याच्या चौपदरी करण्याच्या कामाबरोबरच नवीन पुल बांधण्याचे काम सुरू असून या कामावर पाणी मारण्याच्या टॅकरच्या व ट्रॅक्टरवर मयत ज्ञानेश्वर हा चालक म्हणून काम करत होता.दि.४ शनिवार रोजी तो नेहमी प्रमाणे कामावर पाणी मारण्यासाठी टॅक्टर मागे पुढे घेत असताना रस्त्यावर भराव म्हणून टाकलेली माती धसल्याने अचानक टॅक्टर टॅकरसह खड्यात पलटी झाले त्यात मयत ज्ञानेश्वर हा टॅकरखाली दबला गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.क्रेनच्या साहाय्याने टॅक्टर व टॅंकर वर  काढून दाबलेला मृतदेह शवविच्छेदनासाठी जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला.  घटनास्थळ पिंपळगाव गोलाईत पासून हाकेच्या अंतरावर असल्याने गावकऱ्यांनी व रस्त्यावरील प्रवाशांनी एकच गर्दी केल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहतूकची कोंडी झाली होती.                            घटनेची माहिती मिळताच पहूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाठ,जामनेरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश काळे,उपनिरीक्षक सुनिल कदम आपल्या सहकाऱ्यांसह घटना स्थळी पोहचून वाहतूकीची कोंडी सोडविली.राज्याचे जलसंपदा तथा वैद्यकिय शिक्षण मंत्री मा.ना.गिरीष महाजन यांनीही घटनास्थळी भेट देवून संबंधितांना चौकशीचे आदेश दिले.मयत ज्ञानेश्वर यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,मुलगी ,आई,वडील असा परिवार आहे.मयत ज्ञानेश्वर हा कुटूंबातील कमवता पुरुष असल्याने त्यांच्या कुटूंबांवर उपासमारीची वेळ आली असून संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाईची करून त्यांच्या वारसांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे.       जळगाव जिल्हयासह महाराष्ट्रात महामार्गाच्या चौपदरीकर्णाचे काम संथगतीने सुरू असून वाहन चालकांसह प्रवाशाची गैरसोय होत आहे.पावसाळा तोंडावर येऊन ठेपला आहे.किमान पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्ते पुर्ववत करावे अशी मागणी या निमित्ताने होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.