रुग्णांच्या प्रत्येक बेडवर ऑक्‍सिजनची सुविधा : जिल्हाधिकारी राऊत

0

कोरोना बाधितांची संख्या रोखण्यासाठी त्रिस्तरीय तपासणी पद्धत अवलंबिली जाईल. सोबत तो रुग्ण खासगी कोणत्या डॉक्‍टरांकडे गेला होता. नातेवाइकांकडे गेला होता. त्यांची तपासणी होईल. शक्‍यतोवर लागण झाल्याबरोबरच रुग्ण रुग्णालयात दाखल करण्यावर भर असेल.

जळगाव : जिल्ह्यातील “कोरोना’ रुग्णांची संख्या रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. कोविड कक्षात दाखल प्रत्येक बाधित रुग्णाच्या बेडवर ऑक्‍सिजनची सुविधा असेल. प्रत्येक रुग्णाला वाचविण्यासाठी डॉक्‍टरांनी शर्थीचे प्रयत्न करावेच लागेल. रुग्ण लवकर येण्यासाठी त्रिस्तरीय तपासणी पद्धतीचा अवलंब करणार असल्याची माहिती नुकतेच रुजू झालेले जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पत्रकारांना दिली.

जिल्हाधिकारी राऊत म्हणाले, की कोरोना बाधितांची संख्या रोखण्यासाठी त्रिस्तरीय तपासणी पद्धत अवलंबिली जाईल. सोबत तो रुग्ण खासगी कोणत्या डॉक्‍टरांकडे गेला होता. नातेवाइकांकडे गेला होता. त्यांची तपासणी होईल. शक्‍यतोवर लागण झाल्याबरोबरच रुग्ण रुग्णालयात दाखल करण्यावर भर असेल. ज्यामुळे लवकर उपचार केले जातील. बाधित रुग्णांचा कॉन्टॅक्‍ट तपासणी मोहीम जोरात सुरू केली जाईल. कोविड केअर सेंटरची बळकटी करून केले जाईल. तालुकास्तरावरील रुग्णांवर तेथे उपचार केले तर कोवीड रुग्णालयात अधिक चांगल्या प्रकारे उपचार करता येतील.

वाळूमाफियाचा बंदोबस्त करू
जिल्ह्यात अवैध वाळू हा विषय मोठा असल्याचे अनेकांनी सांगितले. लवकरच त्यांचाही बंदोबस्त करू, असे जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.

व्हीडीओद्वारे संवाद
कोरोना बाधित रुग्णांशी संवाद साधण्यासाठी दिवसातून किमान दोन वेळा निश्‍चित करून व्हिडिओ कॉलद्वारे त्यांचा संवाद घडवून आणण्याचे नियोजन आहे. यामुळे रुग्णांच्या तब्येतीची, मिळणार उपचाराची माहिती नातेवाइकांना मिळेल. उपचाराबाबत ते काळजी करणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले

Leave A Reply

Your email address will not be published.