पचोऱ्यात शिवसेना वर्धापनदिन साजरा

0

गुलाबराव पाटील यांचेहस्ते “शिवालय” कार्यालयाचे उद्घाटन

पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा येथे शिवसेनेतर्फे ५४ वा शिवसेना वर्धापनदिन साजरा करण्यात आला. या वर्धापन दिनाचे औचित्य साधत भडगांव रोडवरील आमदार किशोर पाटील यांचे निवासस्थाना लगत “शिवालय” या नुतन कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचेहस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, पाचोरा – भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, उद्योजक मुकुंद बिल्दीकर, उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील, शहरप्रमुख किशोर बारवकर, नगरसेवक सतीश चेडे, वाल्मिक पाटील, बापू हटकर, जितेंद्र पेंढारकर, पप्पू राजपूत, पप्पू जाधव, वैभव राजपूत, योगेश पाथरवट, दिपक पाटील , स्विय सहाय्यक राजेश पाटील, विजय भोई, यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.