रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी आणले ‘हे’ स्वस्त प्लान ; अनलिमिटेड कॉलिंगसोबत डेटा आणि….

0

मुंबई : देशातील सर्वात मोठी खासगी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या किंमतीचे वेगवेगळे प्लान आणले आहेत. जिओच्या या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगसोबत फ्री एसएमएस, डेटा आणि जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. कंपनीकडे १२९ रुपये, १४९ रुपये, १९९ रुपये, ५५५ रुपयांचे रिचार्ज पॅक आहेत. ज्यात अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग सोबत डेटा मिळतो. या प्लानसंबंधी सविस्तर माहिती जाणून घ्या.

१२९ रुपयांचा जिओ रिचार्ज प्लान

जिओच्या १२९ रुपयांच्या या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लानमध्ये एकूण २ जीबी हाय स्पीड डेटा मिळतो. हा डेटा संपल्यानंतर 64Kbps स्पीडने इंटरनेटचा वापर करू शकतो. या रिचार्ज पॅकमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग मिळते. तसेच एकूण ३०० एसएमएस फ्री मिळते. जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन फ्री मिळते.

१४९ रुपयांचा जिओ रिचार्ज प्लान

जिओचा १४९ रुपयांचा रिचार्ज प्लानची वैधता २४ दिवसांची आहे. या प्लानमध्ये रोज १ जीबी डेटा मिळतो. एकूण २४ जीबी डेटा मिळतो. रोज मिळणारा हाय स्पीड डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होवून 64Kbps होते. व्हॉइस कॉलिंग अनलिमिटेड मिळते. या रिचार्ज पॅकमध्ये रोज १०० एसएमएस फ्री मिळते. जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन फ्री मिळते.

१९९ रुपयांचा जिओ रिचार्ज प्लान

जिओचा १९९ रुपयांचा पॅक असून याची २८ दिवसांची वैधता मिळते. या प्लानमध्ये रोज १.५ जीबी डेटा मिळतो. ग्राहकांना या प्लानमध्ये एकूण ४२ जीबी हायस्पीड डेटा मिळतो. रोज मिळणारा डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होवून 64Kbps होते. ग्राहकांना रोज १०० एसएमएस फ्री मिळते. जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन फ्री मिळते.

५५५ रुपयांचा जिओ रिचार्ज प्लान

जिओचा ५५५ रुपयांच्या प्लानची वैधता ८४ दिवस आहे. या पॅकमध्ये रोज १.५ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच ग्राहकांना यात एकूण १२६ जीबी हाय स्पीड डेटा मिळतो. रोज मिळणाऱ्या डेटाची स्पीड कमी होऊन ती 64Kbps होते. जिओच्या या पॅकमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग, १०० एसएमएस रोज, तसेच जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.

Leave A Reply

Your email address will not be published.