कासोदा येथील भोई गल्ली मेन रोडला रहदारीला अडथळा

0

कासोदा ता ,एरंडोल (प्रतिनिधी) : कासोदा येथील ग्रामपंचायतीची निवडणूक लागली असून उमेदवार आपापल्या प्रचाराला लागले आहे गावात घरोघरी जाताना दिसतात तसेच आपल्या वार्डात बॅनर पण लावताना दिसतात ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे परंतु प्रशासक कासोदा गावाला दुर्लक्ष करीत आहे

कासोदा गावातील मेन रोड बस स्टॅन्ड कडे जाताना गल्लीत पाण्याचे डबके साठलेले आहेत. गटारीचे पाणी वाहून रोडवर आले आहेत. मेन रोड असल्याकारणाने रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. उमेदवार प्रचाराला जात असताना व प्रवाशांना येण्या-जाण्यासाठी हा मेन रस्ता आहे पायी चालणे जिकरीचे होत आहे आज  अंत्ययात्रा  या मार्गाने जात होती त्यांच्या मार्ग बदलावा लागला तरी प्रशासक व ग्राम विकास अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. असे दिसून येते आहे. तरी या रस्त्याच्या समस्या कडे त्वरित लक्ष दयावे. अशी मागणी कासोदा वासियाकडून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.