राहुल गांधी आज काश्‍मीर दौऱ्यावर

0

नवी दिल्ली : कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी विरोधी पक्षाच्या नऊ नेत्यांसह आज काश्‍मीरचा दौरा करणार आहेत कलम 370 रद्द केल्यानंतर राहुल गांधी यांचा हा पहिलाच काश्‍मीर दौरा आहे. या दौऱ्यात राहुल गांधी जम्मू काश्‍मीर आणि तेथील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. या दौऱ्यात राहुल गांधी यांच्यासोबत गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, सीपीआयचे नेते डी. राजा, सीपीएमचे नेते सीताराम येचुरी आणि आरजेडीचे नेते मनोज झा असणार आहेत.

राहुल गांधी यांनी जम्मू काश्‍मीरच्या स्थितीबाबत जेव्हा भाष्य केलं तेव्हा राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी त्यांना काश्‍मीर भेटीचे निमंत्रण दिले होते. राज्यातली परिस्थिती काय आहे ते समजून घेण्यासाठी काश्‍मीरला या असा सल्लाच मलिक यांनी राहुल गांधींना दिला होता. यानंतर आता आज राहुल गांधी जम्मू काश्‍मीरचा दौरा करणार आहेत. परंतु, राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता राहुल गांधी आणि त्यांच्या शिष्टमंडळास राज्यात प्रवेश मिळणार का असा सवाल निर्माण होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.