कार अपघातात खासदाराचा मुलगा जखमी ; डॉक्टरचा मृत्यू

0

नाशिक : पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित यांच्या गाडीला अपघात झाला. नाशिककडे जात असताना त्र्यंबकेश्वर रस्त्यावर अंजनेरी शिवारात टायर फुटल्यामुळे कार खोल दरीत कोसळली. यावेळी रोहितसोबत गाडीत डॉ. संजय शिंदे (४५ वर्ष) हेदेखील होते. या अपघातात संजय शिंदे यांचा मृत्यू झाला तर राजेंद्र आणि डॉ. जतीन संखे गंभीर जखमी झाले. जखमींवर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

गाडीचा टायर फुटल्याने गाडी पुलाचा कठडा तोडून नाल्यात जाऊन कोसळली. आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना मोटारीतून बाहेर काढलं. परंतु, रुग्णवाहिका रुग्णालयात पोहचेपर्यंत संजय शिंदे यांचा मृत्यू झाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.