राष्ट्रवादी आघाडीच्या प्रचार रॅलीने धरणगाव शहर दणाणले

0

धरणगाव :- जळगाव लोकसभेचे राष्ट्रवादी कॉग्रेस , कॉग्रेस , रिपाई व स्वाभिमानी सह मित्रपक्षाचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या आज धरणगाव शहरातील प्रचार रॅलीस जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ढोल -ताश्याच्या गजर , शाहिरांची गाणी व कार्यकर्त्याच्या विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. गावातील बालाजी मंदिरात उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या हस्ते मान्यंवराच्या उपस्थितीत पुजा व नारळ फोडत या प्रचार रॅलीस प्रारंभ झाला.

ही प्रचार रॅली धरणी चौक , कोट बाजार, परिहार चौक, सोनवद रस्त्यावरील बेलदार मोहल्ला कॉम्प्लेस पर्यंत नेण्यात आली. या प्रचार रॅली दरम्यान अनेक ठिकाणी देवकरांचे स्वागत तर महिला बघिणींकडून औक्षण करण्यात आले. या प्रचार रॅलीत माजी आमदार दिलीप तात्या सोनवणे, पक्षाचे कार्याध्यक्ष विलास पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश माणिक पाटील, जि.प. सदस्य रवी देशमुख, तालुकाध्यक्ष धनराज माळी सर, माजी उपनगराध्यक्ष दिपक वाघमारे, डॉ. मिलिंद डहाळे, अॅड. वसंतराव भोलाणे, माजी जि.प. सदस्य रविंद्र पाटील, प्रा.एन .डी.पाटील सर, मोहन पाटील सर, कार्याध्यक्ष भैय्या मराठे सर, शहराध्यक्ष हेमंत चौधरी, कार्याध्यक्ष नारायण महाजन, माजी नगरसेवक निलेश चौधरी , हाजी ईब्राहिम ,महिला तालूकाध्यक्षा शोभाताई पाटील , शहराध्यक्षा चंद्रकला भोलाणे , माजी नगरसेविका पद्मिनी डहाळे , माजी नगरसेविका शिलाताई चव्हाण काँग्रेसचे सुरेश आण्णा भागवत , रतिलालनाना चौधरी , राजूबापू न्हायदे , महेशभाऊ पवार , जगदीश चव्हाण , रामचंद्रभाऊ महाजन , दिपकआबा जाधव , राष्ट्रवादी काँग्रेसचे नईम काजी , सैफु भाई , गुलाम गौस , ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष अरविंद देवरे ,ओबीसी तालुकाध्यक्ष अनिल पाटील , किसान सेलचे नारायण चौधरी , युवकचे तालुकाध्यक्ष नाटेश्वर पवार , युवक शहराध्यक्ष संभाजी कंखरे , प्रफुलभाऊ देवकर , डॉक्टर्स सेल जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन पाटील , मागासवर्गीय सेल जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी , रंगराव सावंत , अमित शिंदे , ओंकार महाजन , लक्ष्मण पाटील सर , किशोर महाजन , मोहरा मराठे , सागर वाजपेयी , गुलाब महाजन , भूषण पाटील , गोपाल चव्हाण , आनंद पाटील , मेघराज पाटील , सचिन सोनवणे , अमोल हरपे , वैभव बोरसे , अमोल सोनार , विक्रम पाटील , दिनेश भदाणे अजय महाजन , कदम सर , नाना पाटील , भदाणे सर , मोठा भाऊ (रोटवद) , सरपंच भाऊसाहेब पाटील (साकरे) , सरपंच किशोर निकम व अभय पाटील (पष्टाने) , दीपक भोई (नांदेड) , माजी सरपंच बाळू आबा , विजय पाटील (सोनवद) , संजय पाटील (भोणे) , राजू पाटील (पिंपळे सिम) , भाऊसाहेब पाटील , पाटील सर, प्रमोद जगताप (बांभोरी) , किशोर पाटील , उत्तम भदाणे (बिलखेडा) , रवि महाजन व श्रावण बागुल (धानोरा) , रवि चव्हाण (आनोरे) यांच्यासह शहर व ग्रामिण भागातील बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

या रॅलीच्या समारोप बेलदार मोहल्ला कॉम्प्लेक्स जवळ झाला. या विकाणी निवडणूकीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन गुलाबराव देवकर यांच्या हस्ते झाले .

Leave A Reply

Your email address will not be published.