दाऊद इब्राहिमच्या बहिणीचा फ्लॅट १ कोटी ८० लाख रुपयांत विकला

0

मुंबई :- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या रत्नागिरीतील चार मालमत्ता व त्याची बहिण हसीना पारकरच्या हिच्या नागपाडा येथील घराचा लिलाव आज करण्यात आला असून १ कोटी ८० लाख रुपयांत हा फ्लॅट विकला गेला आहे. एसफेमा(स्मगलिंग अँड फॉरेन एक्सचेंज मॅनिपुलेटर्स अॅक्ट) कायद्याअंतर्गत या फ्लॅटची विक्री करण्यात आली आहे. केंद्रीय यंत्रणा तस्करी व परदेशी चलन हेराफेरी प्रतिबंधक कायदा (सफेमा) यांनी नागपाड्यातील गॉर्डन हॉल अपार्टमेंट येथील घरावर टाच आणून आज लिलावात केला.

दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर नागपाड्यातील गार्डन सोसायटीमध्ये २०१४ पर्यंत राहत होती. २०१४मध्ये तिच्या निधनानंतर दाऊदचा भाऊ इब्राहिम कासकर या घरात राहू लागला. २०१७मध्ये इब्राहिम कासकरला मुंबई पोलिसांनी अटक केली. तेव्हापासून हा फ्लॅट रिकामाच होता. एप्रिल 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दाऊदच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.