रायसोनीतील भाग्येश त्रिपाठीने तयार केले “अँप”; मुख्यमंत्र्यांनी केले उद्घाटन

0

जळगाव ऑ ”

येथील जी.एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट मधील पदवी स्तरावर शिक्षण घेणारा बी.सी.ए च्या विद्यार्थी भाग्येश त्रिपाठीने तयार केलेल्या “दाधीच कम्युनिटी इंटरनेशनल” अँपचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केले. दाधीच ब्राम्हण समाजातील लोकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी या विद्यार्थ्याने “दाधीच कम्युनिटी इंटरनेशनल” (Android App) हे मोबाईल संचलित सॉफ्टवेअर तयार केले आहे. यामुळे दाधीच समाजातील लोकांना समाजातील संवाद वाढविण्यासाठी अत्यंत मोलाची मदत होणार आहे. विद्यार्थ्याने केलेल्या या संशोधनाची दखल घेत थेट मुख्यमंत्री फडणवीस तथा नागपूरचे आमदार गिरीश व्यास यांनी त्रिपाठी याचा सत्कार केला.
अँपच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर दाधीच समाजातील नागरिक किती आहे याची जनगणना केली जाईल. समाजातील नागरिकांना नोंदणी करून समाजातील एक नागरिक असल्याचे सांगता येईल. विवाहसाठी नोंदणी करता येईल. समाजातील लोकांचे व्यवसाय कोणते कोणते आहे याची माहिती घेता येईल. धार्मिक अभ्यास करता येईल, बातम्या जाणून घेता येतील, समाजातील विविध कार्यक्रम माहिती होतील आणि प्रसिद्ध करता येईल असे विविध प्रकारचे फायदे या सॉफ्टवेअरच्या वापरामुळे समाजातील लोकांना होणार आहे.
महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना वेळोवेळी शिक्षकांनी सांगितलेल्या सर्व सूचना व दिलेले ज्ञान प्रामाणिकपणे वापरले. अभ्यासक्रमा व्यतिरिक्त वेळोवेळी महाविद्यालयात आयोजित होत असलेले एन्ड्रोईड वर्कशॉपचा मला मोठ्या प्रमाणात फायदा झाला. त्यामुळे सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाचे अधिक ज्ञान मिळाले, माझ्यातील काही कमतरता दुरावे लक्षात घेऊन त्यात बदल करून स्वतःला रायसोनी महाविद्यालयातील शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे विकसित करू शकलो असे मनोगत भाग्येश त्रिपाठी याने महाविद्यालयात झालेल्या त्याच्या सत्काराप्रसंगी व्यक्त केले.   मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झालेल्या या (Android App) सॉफ्टवेअरच्या उद्घाटनाप्रसंगी महाराष्ट्र दाधीच समाजाचे अध्यक्ष सत्यनारायण खटोड, मुबई ठाणे विभागाचे अध्यक्ष प्रमोद दाधीच, पुणे समाज विभाग अध्यक्ष दिनेश आसोपा, नागपूर विभाग अध्यक्ष महेश तिवारी, कैलाश दाधीच, पुरुषोत्तम बिसावा, सुनील दायमा, महिला प्रतिनिधी संतोषीदेवी शर्मा उपस्थित होते. तसेच महाविद्यालयात अभिनंदन करतांना कार्यकारी संचालक प्रितम रायसोनी, संचालिका डॉ.प्रिती अगरवाल, विभागप्रमुख प्रा.मकरंद वाठ, विभागप्रमुख प्रा.राफिख शेख सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.