श्री. गो. से. हायस्कुलचे एन. एच. पाटील यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न

0

पाचोरा | प्रतिनिधी
श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा येथील उपशिक्षक एन. एच. देसले हे ३१ मे २०१९ रोजी सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम दिनांक २९ शनिवार रोजी घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे व्हाईस चेअरम व्ही. टी. जोशी होते. यावेळी माजी आमदार तथा पी. टी. सी. अध्यक्ष दिलीप वाघ यांच्या हस्ते एन. एच. देसले यांचे सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर मंगल फंडातून ५ हजार रुपयांचा चेक देसले सरांना सुपूर्त करण्यात  आला. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन  संजय वाघ, शालेय समितीचे चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभाग चेअरमन वासुदेव महाजन, ज्येष्ठ संचालक दगाजी  वाघ, सतिष चौधरी, अर्जुनदास पंजाबी, योगेश पाटील, मोहन पाटील, शाळेचे मुख्याध्यापक एस. डी. पाटील उपस्थित होते. सर्वप्रथम मुख्याध्यापकांनी सर्व पाहुण्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. त्यानंतर प्रास्ताविक सादर करताना मुख्याध्यापकांनी एन. एच. देसले यांच्याविषयी गौरवोद्गार काढून कौतुक केले. यावेळी  देसले यांनी सत्काराला उत्तर देतांना आपला जीवनपट सगळ्यांसमोर मांडला. ए. बी. अहिरे, एल. एस. शिंपी, दिलीप वाघ यांनी व शालेय समितीचे चेअरमन खलील देशमुख यांनी देसले यांचा कार्याचा गौरव केला. व्ही. टी. जोशी यांनी अध्यक्षीय समारोप केला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्वल पाटील तर आर. एल. पाटील यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली . कार्यक्रमास विद्यालयातील मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, विभाग प्रमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  आर. एल. पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.