पिचर्डे येथे सेवानिवुत्त जवानाचा नागरी सत्कार

0

भडगाव | प्रतिनिधी 

भडगाव तालुक्यातील पिचर्डे गावाचे सुपुत्र रविंद्र धनराज पाटील  हे भारतीय सैन्य दलातुन आपली 17 वर्ष सेवा करून नुकतेच सेवानिवुत्त झाले या निम्मीताने पिचर्डे येथीव  जय जवान ,जय किसान फांऊडेशन  यांच्या कडुन रविंद्र धनराज पाटील  यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
सीमेवर फडकणारा तिरंगा हा वाऱ्यामुळे नाहीतर. सीमेवर उभ्या असलेल्या सैनिकांच्या श्वासाने फडकतो या ओळीप्रमाणे भारतीय सैन्य दलाचे काम असते.  सैन्य दलातील निवृत्त जवान  रविंद्र पाटील यांची गावात सजविलेली जिप मधुन सवाद्य होऊन , फटाके फोडुन ,बँन्ड  गजरात भव्य मिरवणुक पिचर्डे गावातुन काढण्यात आली घरोघरी त्यांचे महिलांनी औक्षण करण्यात आले त्यांच्या सोबत  गावातील भारतीय सैन्य दलाचे जवान दिपक मोतीराम बोरसे,सतोंष विकम सावळे,दिपक ईश्वर पाटील,पंढरीनाथ चिंधा महाजन,हर्षल भिमराव पाटील,नंदु चिंधा महाजन हे गावी आले होते.  हे या मिरवणुक उपस्थित त्या बरोबरच   गावातील सैन्य दलातील जवान समवेत त्यांचे कुटुंबीय तसेच पिचर्डे ग्रा पंचायत संरपच,उपसंरपच सर्व सदस्य गावातील नागरिक, महिला , तरुणवर्ग मोठया प्रमाणात  उपस्थिरी होते. यावेळी गावामध्ये देहभक्तीपर घोषणा ही देण्यात आल्या मिरवणुक पुर्ण झाल्या नंतर पिचर्डे  येथील जव जवान,जय किसान फांऊडेशन यांच्याकडुन रविंद्र पाटील यांचा जाहिर नागरी  सत्कार करण्यात आला.   व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून पिचर्डेयाचे सुपुत्र चाळीसगाव नायब तहसिलदार विशाल सोनवणे हे होते तर यांच्या सोबत पाचोरा येथील राष्ट्रवादीचे नगरसेवक भुषन  वाघ, खेडगाव ता चाळीसगाव येथील शहिद जवान अमोल सांळुखे  यांचे आई वडील ,माजी संरपच राजेंद्र घोडके,माजी चेअरमन विठ्ठल सोनु पाटील,आदर्श कन्या विघालयाचे चेअरमन दिपक संभाजी महाजन,बात्सरचे संरपच पती भिकन शिवराम पाटील,शिवणी संरपच रामसिंग धनसिंग पाटील,पिचर्डे येथील संरपच पती  नाना शंकर पवार,उपसंरपच विनोद हेमराज बोरसे ,पो.पाटील हेमराज महाजन  हे व्यासपीठ वर हजर होते पिचर्डे ग्रा पंचायत कडुन ही रविंद्र पाटील यांचा सत्कार संरपच पती  नाना शंकर भिल, उपसंरपच विनोद हेमराज बोरसे, अनिल  भगवान महाजन,निंबा बाबुलाल पाटील,सुरेश भिल,तसेच सुनिल रामकुष्ण पाटील ,पिचर्डे येथील पत्रकार धनराज भिकन पाटील यांच्या हस्ते यांचा सहकुटुंबासह संयुक्त सत्कार करण्यात आला व त्यांना ग्रा पंचायत कडुन   स्मृतिचिन्ह भेट देण्यात आले यांच्यासह विविध गावातील नागरीक यांच्या कडुन सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या सुरूवातीला पिचर्डे येथील नाना रामसिंग पाटील यांनी ऐ मेरे वतन के लोग हे देशभक्तीपर गीत सादर केले. यानंतर नायब तहसिलदार विशाल सोनवणे यांनी आपल्या मनोगतातुन रविंद्र धनराज पाटील यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या व जय जवान जय किसान फांऊडेशन  चे या उपक्रमाबद्दल कौतुक केले.   कार्यक्रमाची सांगता केली कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेंद्र नारायण पाटील यांनी केलेया कार्यक्रमाचे यस्वशीसाठी पिचर्डे येथील जय जवान ,जय किसान फांऊडेशनचे सदस्य व भारतीय सैन्य दलाचे जवान दिपक बोरसे,संतोष सावळे,दिपक पाटील,पंढरीनाथ महाजन,हर्षल पाटील नंदु  महाजन,याच्यासह गावातील  ग्रा पंचायत चे सर्व सदस्य ,ग्रामस्थ,तरूण बांधवानी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे आयोजन पिचर्डे येथील फौजी बांधवानी स्थापन केलेले जय जवान जय किसान फांऊडेशन केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.