राज ठाकरेंच्या घरी पोहोचला कोरोना ; घरकाम करणाऱ्या दोघांना कोरोनाची लागण

0

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशात लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत आहे. अशात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेले कृष्णकुंज येथे करोनाने धडक दिली. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकांपैकी तिघांना करोनाची लागण झाल्याचे समजले होते. त्यानंतर आता राज ठाकरे यांच्या घरात काम करणाऱ्या दोघांना करोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, करोनाची लागण झालेल्या व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. या आधी राज ठाकरे यांच्या तीन सुरक्षा रक्षकांना करोनाची लागण झाली होती. मात्र, सुदैवाने हे सुरक्षारक्षक करोनामुक्त झाले. पण आता राज यांच्या घरात काम करणाऱ्या दोघांचा करोना तपासणीचा अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. यातील एक हा राज ठाकरे यांच्या घरी घरकाम करत होता. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.