भडगावात स्वयंसफूर्ती जनता कर्फ्युचा फियास्को ; सर्व दुकाने सुरू

0

भडगाव (प्रतिनिधी) : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे म्हणून तीन दिवसांचा स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यु करावे यासाठी काल आमदार किशोर आप्पा पाटील यांनी शिवसेना कार्यालयावर भडगाव शहरातील व्यापाऱ्यांची बैठक घेतली होती. यात होकार सुद्धा झाला परंतु आज सकाळीच कोणीही जनता कर्फ्यु न ठेवता सर्व दुकाने उघडून याकडे पाठ फिरवली असून जनता कर्फ्यु चा फियास्को झाल्याचे दिसत आहे.

गेल्या तीन ते चार महिन्यांपासून लॉक डाऊन, जनता कर्फ्यु, प्रशासनाचा जनता कर्फ्यु, स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यु असे कित्तेक वेळा मार्केट बंद चालू झाले. यामध्ये जी व्यवसायाची लिंक होती ती सर्व तुटली व व्यवसायात मंदीचे सावट आले असता कोरोना ने सुधा तालुक्यात डोके वर काढले आहे. या साठी शहर तीन दिवस बंद पाळावे असे आवाहन कालच्या बैठकीत केल्यानंतर व्यापाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करत आज सकाळी आपली दुकाने उघडली असून काल सायंकाळी सोशल मीडियावर भडगावला जणता कर्फ्युची गरज नाही. आत्ता कुठेतरी सर्व व्यवसाय पुर्वपदावर येत आहे. त्यातच जर कोणी जणता कर्फ्यु लादत असेल तर हे चुकिचे आहे.

सोशल डिस्टंसिंग व मास्क न लावणार्यांकडून दंड घ्या हवतर गुन्हे दाखल करा परंतु जणता कर्फ्यु लादून व्यापारी व छोट्या व्यावसायिकांना पोटावर मारू नका. असे मॅसेज फिरल्यावर भडगाव शहरात संभ्रम निर्माण झाला व बंद राहील की चालू राहील ही चर्चा सुरू झाली व सकाळी स्वयंसफूर्तीने जनता कर्फ्यु कडे दुर्लक्ष करीत व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू केली यामुळे भडगावात तरी जनता कर्फ्यु चा फियस्को झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.