नाडगाव ते बोदवड रस्त्यातील खड्डे बुजवण्याच्या कामास सुरुवात

0

बोदवड (प्रतिनिधी) – रेल्वे स्टेशन रस्त्याचे खड्डे मातीयुक्त मुरुमाने बुजविले जात असल्याची तक्रार शिवसेना युवासेनेकडून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंता देसाई यांना करण्यात आली होती. याची एमएसआरडीसीकडून तात्काळ दखल घेण्यात आल्यामूळे मागणीप्रमाणे सुरुवातीला बोदवड ते नाडगाव या रस्त्यावरील खड्डे डांबर व खडी टाकून त्यावर रोलिंग करुन बुजविण्याचे काम गंगामई कन्स्ट्रक्शन कंपनीकडून केले जात आहे.यादरम्यान हिंगणे फाट्याजवळ रसत्याच्या कडेला ओडिएची पाईपलाईन फुटली असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी रसत्यांवर आले होते.त्यात ; रस्त्याच्या दोन्ही बाजू मातीने बुजविल्या गेल्या असल्याने पाणी थेट रस्त्यावर येत होते.त्यामूळे तुंबलेल्या पाण्यामूळे खड्डे दिसेनासे झाल्याने दुचाकींच्या अपघातांचे प्रमाण वाढले होते.यावेळी शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमूख सुनिल पाटिल यांनी एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता देसाई यांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली असता त्याच दिवशी तात्काळ पाण्याला यंत्राच्या साहाय्याने वाट काढून दिली व येत्या दिवसांत जेसीबीच्या साहाय्याने दुतर्फावरील चा-या मोकळ्या करण्यात येणार आहे.

शहरापासून स्टेशन रोडवर जाणा-या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असून खड्डे बुजवण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षापासून होती. साधारणत:सहा ते सात दिवसां अगोदर याच रस्त्यातील खड्डे मातीयूक्त मुरुन टाकून ते बुजविण्यात आले होते. पावसाळा पुर्व नियोजनासाठी खड्डयांमूळे अपघात होऊ नये यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून खड्डे बुजविण्याविषयक सुचना देण्यात आल्या होत्या.परंतू ; संबंधित कंत्राटदाराने खडी व डांबर टाकून त्यावर रोलिंग करणे गरजेचे असतांना मातीयुक्त मुरुम टाकून अर्धवट मलमट्टी करण्याचा प्रयत्न केला.

सदरील रस्ता हा राष्ट्रीय राजमार्ग ७५३(एल) मध्ये येत असल्याने त्याची देखरेख व डागडूजी महाराष्ट्र राज्य विकास महामंडळ नाशिक विभागाच्या नियंत्रणात आहे.यासंदर्भातील तक्रार एमएसआरडीसीचे जळगाव येथील कार्यकारी अभियंता देसाई यांना शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमूख सुनिल पाटिल,शिवसेना कार्यकर्ते दिपक माळी व युवासेनेचे तालूका समन्वयक अमोल व्यवहारे यांनी दिली होती.याची तात्काळ दखल म्हणून कार्यकारी अभियंता देसाई यांनी संबंधित कंत्राटदारास सुचना दिल्या.त्यानंतर येथील खड्डे बुजविण्यासाठी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून पहूर ते नाडगाव (रेल्वे स्टेशन गेट) पर्यंत गंगामई कन्स्ट्रक्शन कंपनिचे कंत्राट आहे.त्यामूळे रस्त्यावरील खड्डे कुठपर्यंत बुजविले जातात? यावर शिवसेना युवासेनेचे लक्ष लागून आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.