राज्यात १०० युनिट मोफत वीज देण्याचे ऊर्जामंत्र्यांचे संकेत

0

मुंबई :– सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय महाविकास आघाडी घेण्याच्या तयारीत आहे.  कारण ठाकरे सरकार राज्यातील 100 युनिट पर्यंतची वीज ‘फ्री’ करणार असल्याचे समजतंय. राज्यात 200 युनिट पर्यंत फ्री वीज देणं शक्य आहे, अशात 100 युनिटपर्यंतची फ्री वीज ग्राहकांना कशी मिळेल यावर सरकार विचार. यासाठी तीन महिन्याचा कालावधी विभागाला देण्यात आला असून याबद्दलची माहिती स्वतः ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे.

अशा पद्धतीने मोफत वीज देता येईल का याची पडताळणी करण्यात येत आहे. महावितरण आणि उर्जा खात्यावरील बोजा कमी करणे, लिकेज बंद करणे, वसुली आहे त्याचे निकष तयार करणे जेणेकरून त्यामुळे जनतेला त्रास होणार नाही याबाबत विचार सुरु आहे. आर्थिकस्थिती सुधारणे, उत्पादन खर्च सर्वात कमी करणे, वीज दर कमी करणे या सर्व बाबींचा विचार केल्यानंतरच यावर निर्णय घेणार असल्याचे उर्जामंत्री म्हणाले. एकीकडे वीज नियामक आयोग वीज वाढीचा प्रस्ताव देत असताना वीज मोफत देणे कसे शक्य आहे, असे विचारले असता उर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले, ते प्रस्ताव पाठवत असतात ते त्यांचे काम आहे. मात्र सर्व बाबी पडताळल्यानंतरच याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे राऊत म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.