कट्टर शिवसैनिक नेता आज मनसेत प्रवेश करणार

0

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिका निवडणुकांच्या ऐन तोंडावर शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा अत्यंत विश्वासू असलेले शिवसेनेचा स्थानिक नेता आज मनसेत प्रवेश करणार आहे. शिवसेनेचे पदाधिकारी सुहास दशरथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज सकाळी अकरा वाजता ‘कृष्णकुंज’वर पक्षप्रवेश होणार आहे.

सुहास दशरथे हे शिवसेनेचे लोकसभा सहसंपर्क प्रमुख म्हणून कार्यरत होते. गेल्या 38 वर्षांपासून दशरथे हे शिवसेनेत कार्यरत होते. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे ते अत्यंत विश्वासू मानले जातात.

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने नऊपैकी सहा जागांवर विजय मिळवला. मात्र महापालिका निवडणुकीच्या तोंडावर दशरथे मनसेत प्रवेश घेत असल्यामुळे शिवसेना झटका बसण्याची शक्यता आहे. एप्रिल 2020 मध्ये औरंगाबाद पालिकेची निवडणूक होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.