राज्यात ‘मिशन बिगीन अगेन’चा पहिला-दुसरा टप्पा आजपासून, काय सुरु काय बंद?

0

मुंबई : केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्र सरकारकडून देखील राज्यासाठी नियमावली जाहीर करण्यात आली होती. ३१ मे रोजी जारी करण्यात आलेल्या या नव्या नियमावलीमध्ये महाराष्ट्रात नवी सुरूवात करण्यासाठी ठाकरे सरकारने “मिशन बिगीन अगेन’ हे नवे धोरण राबवण्याचा निर्णय घेतला होता.‘मिशन बिगीन अगेन‘चा पहिला आणि दुसरा टप्पा आजपासून एकत्रित सुरु होत आहे. त्यानुसार राज्यात अनेक ठिकाणी काही प्रमाणात शिथिलता येणार आहे. प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर सर्व भागातील दुकाने आता सशर्त उघडणार आहेत.

राज्य सरकारने 3 जून, 5 जून आणि 8 जून अशा तीन टप्प्यात अनेक गोष्टी सुरू करण्यात येणार असल्याचं याआधीच स्पष्ट केलं होतं. जाहीर करण्यात आलेल्या सुधारणांमध्ये याआधी जाहीर करण्यात आलेली कोणतीही गोष्ट वगळण्यात आली नसली तरी त्यामध्ये काही दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत.सुधारित नियमांमध्ये जिल्हांतर्गत व राज्यांतर्गत प्रवास नियमांनुसारच होणार असल्याचं म्हंटलं आहे. परंतु मुंबई महानगरीय क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये येथील नागरिकांना मुक्तपणे प्रवास करता येणार आहे. परप्रांतीय मजूर, प्रवासी, तीर्थयात्री यांचा प्रवास आधीच्या नियमांनुसारच होईल.

पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात राज्यात ‘या’ गोष्टींना परवानगी

पहिला टप्पा – यात सायकलिंग, धावणे, चालणे अशा व्यायामांना परवानगी. सकाळी 5 ते संध्याकाळी 7 या वेळेत खाजगी किंवा सार्वजनिक मैदाने, समुद्र किनारे, बाग इत्यादी ठिकाणी व्यायामाला मुभा, केवळ इनडोर स्टेडियममध्ये परवानगी नाही

सामुहिक (ग्रुप) अॅक्टिविटीजना परवानगी नाही, लहान मुलांसोबत पालकांना थांबणे अनिवार्य, केवळ जवळच्या ठिकाणी व्यायाम करण्यास जाण्याची सूचना, मोकळ्या जागेतील गर्दीची ठिकाणे टाळावी

सायकलिंग करण्यास अधिक प्रोत्साहन, यातून शारीरिक व्यायामासोबत सोशल डिस्टन्सिंग पाळले जाते.

प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल अशा तंत्रज्ञांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर याचा वापर करुन काम करावे, गॅरेजची वेळ घेऊन वाहन दुरुस्ती कामे करावीत

सर्व सरकारी कार्यालये गरजेनुसार किमान 15 टक्के कर्मचारीवर्ग किंवा किमान 15 कर्मचारी (जे अधिक असेल ते) यामध्ये काम करतील.

दुसरा टप्पा – दुसऱ्या टप्प्यात मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्सवगळता सर्व बाजार, दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत एकआड एक दिवस उघडतील.

१. ट्रायल रुम बंद राहतील. कपडे परत घेणे किंवा बदलून देणे, यांना मुभा नाही

२. सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची जबाबदारी दुकानदारांची, त्यांनी होम डिलिव्हरी, टोकन सिस्टम, मार्किंग अशी पद्धत अवलंबावी

३. जवळच्या बाजारात जाण्यासाठी पायी किंवा सायकलने जावे, आवश्यक खरेदीसाठी जवळच्या जवळ बाजारात जावे, खरेदीला जाण्यासाठी वाहनाचा वापर टाळावा

टॅक्सी, कॅब, रिक्षा, चारचाकी – केवळ आवश्यक प्रवासासाठी चालक + 2

दुचाकी – केवळ चालक

 

 तिसऱ्या टप्प्यात ‘या’ गोष्टी शिथील होणार

तिसरा टप्पा – येत्या 8 जून पासून तिसरा टप्पा सुरु होईल. या टप्प्यात खासगी कार्यालये गरजेनुसार किमान 10 टक्के कर्मचारी वर्गासह उघडू शकतात. इतरांना वर्क फ्रॉम होम करण्यास प्रोत्साहित करावे.

नाईट कर्फ्यू 

संपूर्ण महाराष्ट्रात रात्री 9 ते सकाळी पाच वाजेपर्यंत कडकडीत बंद राहील. यावेळेत फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. याशिवाय नागरिकांनाही घराबाहेर पडण्यास बंदी राहील. रात्री 9 ते सकाळी 5 यावेळतही जमावबंदी म्हणजेच कलम 144 लागू असेल.

65 पेक्षा जास्त वयोगटातील आणि 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लहान मुलांनी घरातच राहावे.

कोरोना रुग्णांची संख्येनुसार जिल्हा प्रशासन किंवा महापालिका प्रशासनाने कंटेन्मेंट झोन घोषित करावेत. हा कंटेन्मेंट झोन हा एकदा परिसर, नगर, इमारत, झोपडपट्टी किंवा शहरात घोषित केला जावू शकतो. या भागात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वया भागातील कायदेशीरपणे कडक कारवाई करण्यात येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.