जळगाव जिल्ह्यात आणखी दोन पॉझिटिव्ह आढळले ; रुग्ण संख्या ९०९

0

जळगाव : जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या काही केल्या कमी होत नाहीय. जिल्ह्यात रात्री उशीरा आणखी २३ कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. पैकी २१ अहवाल निगेटिव्ह तर २ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात मुक्ताईनगर 1,जामनेर 1, असे एकुण 2 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ९०९ वर गेली आहे.

दरम्यान, आतापर्यंत 113 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 429 जण कोरोना मुक्त होऊन घरी गेले आहे.आणि 365 जणांनवर उपचार सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.