राज्यात कोरोनाचा ‘विस्फोट’ ! रुग्णसंख्येने गाठला आजपर्यंतचा सर्वाधिक ‘उच्चांक’

0

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.गेल्या २४ तासांमध्ये ५ हजार २४ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यातील रुग्णसंख्येने आजपर्यंतचा सर्वाधिक ‘उच्चांक’ गाठला आहे. तसंच जे १७५ मृत्यू गेल्या चोवीस तासांमध्ये नोंदवले गेले आहेत त्यातले ९१ मृत्यू गेल्या ४८ तासांमधले आहेत. तर ८४ मृत्यू मागचे आहेत. सध्याच्या घडीला ६५ हजार ८२९ केसेस पॉझिटिव्ह आहेत असंही आरोग्य विभागाने म्हटलं आहे.

महाराष्ट्रात गेल्या २४ तासांमध्ये २३६२ रुग्ण बरे झाले आहेत. तर ७९ हजार ८१५ रुग्ण आत्तापर्यंत बरे होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५२.२५ टक्के इतके झाले आहे. तर राज्यात ५ हजार २४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यात १७५ जणांचा मृत्यू करोनाची लागण झाल्याने मागील २४ तासांमध्ये झाला आहे. राज्यातील मृत्यू दर हा ४.६५ टक्के इतका आहे. मागील २४ तासांमध्ये नोंदवण्यात आलेल्या मृत्यूंपैकी ९१ मृत्यू हे मागील दोन दिवसांमधले तर उर्वरीत ८४ मृत्यू हे मागील कालावधीतले आहेत.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ८ लाख ७१ हजार ८७५ नमुन्यांपैकी १ लाख ५२ हजार ७६५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ५८ हजार ४८८ लोक होम क्वारंटाइन आहेत. तर ३६ हजार ९०३ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता १ लाख ५२ हजार ७६५ इतकी झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.