पारोळा येथे आजपासून दोन दिवस प्रशासनाकडून आरोग्य तपासणी

0

पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा येथे दोन दिवस संशयीत रुग्णांच्या तपासणीसाठी शासनाच्या वतीने ओतार गल्ली व कुरेशी मोहल्ला या कन्टैंटमेंट झोन मधील नागरिकांच्या आरोग्य तपासणी करण्याचे ठरवण्यात आले आहे, यात संशयित व जुन्या आजार असलेल्या रुग्णांची यादी तयार करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे ज्याला प्रशासनाने मास्क स्क्रिनिंग असे नाव दिले आहे.याबाबत दि २६ रोजी तहसील कार्यालय येथे बैठक घेण्यात येवुन अधिकारी,खाजगी डाँक्टर्स,नगरसेवक व माध्यम प्रतिनिधिंच्या माध्यमातुन सदर मोहीमेत नागरिकांना आवाहन करण्यात आले.

यावेळी प्रांतअधिकारी विनय गोसावी,तहसिलदार अनिल गवांदे,तालुका आरोग्य अधिकारी डाॅ, प्रांजली पाटील,सपोनि रविंद्र बागुल,डाॅ, चेतन बडगुजर,डाॅ विजय पाटील,डाॅ, रविंद्र नावरकर,डाॅ, शितल मिसर यांचेसह काही खाजगी डाॅक्टर व शहर तलाठी निशिकांत पाटील उपस्थित होते.

यावेळी प्रांतअधिकारी विनय गोसावी यांनी स्पष्ट केले कि, तालुक्यात सध्यस्थितीत आतापर्यत एकुण ५७१ नमुने घेण्यात आले होते.त्यात आजपर्यत २४२ रुग्ण पाँझिटिव्ह मिळुन आले तर खाजगी व सरकारी मिळुन ४०८ रुग्ण निगेटीव्ह प्राप्त झाले. तर आज दि.२६ पर्यत तालुक्यातुन एकुण ४४नमुने प्रलंबित असुन आजअखेर तालुक्यात अँक्टीव्ह केस हे ७९ असुन त्यातील ३५ रुग्ण हे कोवीड सेंटरला उपचार घेत आहेत.तर इतर ४४ रुग्ण खाजगी रूग्णालयात उपचार घेत आहेत.

या अनेक जण बाधीत रुग्णांच्या संपर्कात आल्याने मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्खेत वाढ झाली असली तरी प्रशासनाने युध्द पातळीवर आवश्यक त्या उपाययोजना करुन २४२ पैकी १५३ रुग्णांना बरे करीत घरी सोडण्यात आले आहे.दिवसें दिवस रुग्णांची संख्खा ही कमी होत असुन नागरिकांनी खाजगी प्रयोगशाळेत तपासणी न करता शासनाचा मोफत तपासणीचा लाभ घ्यावा असे,आवाहन देखील त्यांनी केले.

आज पासुन दोन सुरु होणार्या आरोग्य तपासणी बाबत प्रशासनास आमदार चिमणराव पाटील व नगराध्यक्ष करण पवार यांनी केलेल्या सुचने नुसार सदर मोहीम राबविली जात असुन आज दि,२७ शनिवार रोजी पारोळा येथिल कन्टेमेट झोन असलेले ओतार गल्लीत सिंधी मंगल कार्यालय येथे तर दि २८ रोजी कुरेशी मोहल्ला भागात मज्जिदीजवळ आरोग्य शिबीर घेण्यात येणार आहे.यात नागरिकांचे शरीराचे तापमान व आँक्सीजन मात्रा घेण्यात येवुन गरजु रुग्णांना मोफत औषधी वाटप करण्यात येणार आहे.तसेच जुन्या आजार असलेले रुग्ण,संशयित लक्षणे असलेली रुग्ण यांच्या स्वतंत्र याद्या तयार करुन त्यांना पुढील उपचारासाठी योग्य ते मार्गदर्शन केले जाणार आहे.
यावेळी स्थानिक नगरसेवकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी व पारोळा येथिल व्यापारी महासंघाच्या पदाधिकारी यांनी नागरिकांना आरोग्य तपासणीचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घेण्याचे आवाहन करावे असे सांगितले.

पारोळा तालुक्यात आणखी चार पाझिटीव्ह
दि,२६ रोजी पारोळा येथे चार पोझिटिव्ह रुग्ण आढळले. याबाबत पारोळा येथिल वैधकिय अधिकारी डाॅ, योगेश साळुंखे यांनी सांगितले कि,एकुण पाठविलेल्या ३७ नमुन्या पैकी सावरखेडे येथील दोन तर सानेगुरुजी काँलनी येथील एक अश्या तीन महीलांचा अहवाल पाँझिटिव्ह मिळुन आला तर रत्नापिंप्री येथील एक खाजगी अहवाल देखील पाँझिटिव्ह मिळुन आल्याने तालुक्यातील एकुण पाँझिटिव्ह रुग्णांची संख्खा २४३ आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.