हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करणारा शहर पोलिसांच्या जाळ्यात

0

भुसावळ (प्रतिनिधी)- शहरातील टेक्निकल हायस्कुल रमाई नगर भागात हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्यास शहर पोलिसांनी रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले.

रमाई नगर भागात शुक्रवार 26 जून रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास हातात तलवार घेऊन एक जण दहशत निर्माण करीत फिरत आहे. अशी गोपनीय माहिती शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांना मिळताच घटनास्थळी शहर पोलिस स्टेशन कर्मचारी बंटी सैदाणे ,साहिल तडवी, संजय बडगुजर,जुबेर शेख,जितेंद्र सोनवणे यांना पाठवून सापळा रचून संशयीत आरोपी संदीप प्रकाश मोरे (सफाई कामगार ) वय 30 , राहणार टेक्निकल हायस्कुलच्या मागे यास तलवारसह रंगेहात ताब्यात घेतले . या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पो कॉ जितेंद्र संतोष सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोहेकॉ सुपडू पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.