राज्यातील 18 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

0

नाशिक :- आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नांगरे-पाटलांसह सहा अधिकाऱ्यांचा समावेश असून अन्य १० पोलीस अधिकार्यांचा समावेश आहे. विश्वास नांगरे पाटील यांची नाशिक पोलीस आयुक्तपदी बदली झाली आहे. दुसरीकडे, नाशिक पोलीस आय़ुक्त रवींद्र सिंघल यांची औरंगाबाद परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

 कुणाची कुठे बदली झाली?
जळगावचे पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांची पोलीस अधीक्षक, सुरक्षा, महावितरण, मुंबई येथे बदली झाली असून त्यांच्या जागी नाशिकचे एसपी-एसीबी पी.व्ही. उगले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे शहरचे पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांची साताराच्या पोलीस अधीक्षकपदी, निवासी उपायुक्त, महाराष्ट्र सदन, नवी दिल्लीचे इशू सिंधू यांची अहमदनगरच्या पोलीस अधीक्षकपदी, अहमदनगरचे पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांची पोलीस अधीक्षक, CID, नागपूर येथे बदली, भंडाराचे पोलीस अधीक्षक विनिता साहू यांची गोंदिया पोलीस अधीक्षकपदी बदली. गोंदियाचे पोलीस अधीक्षक हरिष बैजल यांची समदेशक, SRPF, गट क्रमांक ६, धुळे येथे बदली. पोलीस अधीक्षक, सुरक्षा, महावितरण, मुंबईचे अरविंद साळवे यांची पोलीस अधीक्षक, भंडाराला बदली. अमरावतीचे अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांची अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती, पुणे ग्रामीणपदी बदली. तर साताऱ्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची पोलीस उपायुक्त, पुणे शहर ला बदली करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.