राज्यातील सर्वात मोठी वक्तृत्व स्पर्धा

0

११ व १२ रोजी होणार स्पर्धा

मुंबई | प्रतिनिधी 

फन लीडर्स गोरेगावतर्फे राज्यस्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यंदा या स्पर्धेचे  7 वं वर्ष असणार आहे. ही स्पर्धा शनिवार, 11 मे आणि रविवार 12 मे रोजी गोरेगाव येथे असणार आहे.
या वक्तृत्व स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 25 हजार राहील. यासोबत एकपात्री अभिनय आणि स्वलिखीत काव्यवाचन स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. काव्यवाचन आणि एकपात्री या स्पर्धांसाठी विषय मर्यादा नाही.
वक्तृत्व स्पर्धा

– प्रथम पारितोषिक  25 हजार रोख, ट्रॉफी, प्रशास्तिपत्रक

. द्वितीय पारितोषिक 15 हजार रोख, ट्रॉफी, प्रशास्तिपत्रक

. तृतीय पारितोषिक 10 हजार रोख, ट्रॉफी, प्रशास्तिपत्रक

पाच उत्तेजनार्थ पारितोषिके- प्रत्येकी एक हजार रुपये रोख, ट्रॉफी, प्रशास्तिपत्रक

वक्तृत्व स्पर्धेचे विषय – उगाच भेटी, उगाच गाठी, शिक्षण विभाग- वर्चुअल की रियालिटी

, आता पुन्हा निवडणुका येणार कोर्टाच्या कात्रीत लाल फिती कारभार, त्याच्या तिचा पाऊस जरा वेगळा असतो. यापैकी एका विषयावर 7 मिनिटे बोलायचे आहे

 

Leave A Reply

Your email address will not be published.