फौजीच्या घराचे बंद कुलूप तोडून अज्ञात चोरट्यान कडून 2 लाख 35 हजाराचा ऐवज लंपास

0
एरंडोल प्रतिनिधी…
एरंडोल – येथे साईनगर प्लॉट नंबर 34 डी येथे 2 मे 2019 रोजी रात्री दीपक रतन शिंदे या फौजी कडे घरफोडी होऊन 2 लाख 35 हजार 260 रुपयाच्या ऐवज लंपास करत अज्ञात चोरट्यांनी पोबारा केला.
विशेष हे की घरातील मंडळी व पाहुणे उन्हाळ्याचे दिवस असल्याने घराचे गच्चीवर झोपल्याची संधी साधून घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी हात मारला. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    एरंडोल येथील दीपक रतन शिंदे काश्मीरमध्ये भारतीय सैन्यात नोकरीला असून 16 मार्च2019 रोजी 50 दिवसाची सुट्टी घेऊन घरी आले 2 मे 2019 रोजी शिंदे हे उन्हाळ्याचे दिवस असल्याने घराला कुलूप लावून त्यांच्याकडे आलेले पाहुणे साडू,साली, भाऊ यांच्यासह संपूर्ण परिवार घराचे गच्चीवर झोपले होते. या संधीचा अज्ञात चोरट्यांनी फायदा घेत घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व रोकड 90 हजार रुपये सह 1 लाख 41 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व 3760 किमतीचे चांदीचे दागिने लंपास करून पोबारा केला.
    दरम्यान शान पथक मागविण्यात आले असता त्याने रस्ता पर्यंत माग दाखविला फिंगर एक्सपोर्ट लाही पाचारण करण्यात आले.
पहाटे फौजी ची पत्नी गच्चीवरून खाली उतरली असता त्यांना घराचे कुलूप तुटल्याने चोरी झाल्याचे लक्षात आले व त्यांनी त्यांचे पतीला आरोळी मारून बोलावले व पोलिसांना कळविण्यात आले असता त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला भादवि कलम 457,380 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक हे पुढील तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.