संसार मोडण्यास कारणीभूत ठरताय मोबाइल

0

पती म्हणतो ,पत्नी सारखी मोबाइलवर बोलते ; तर पत्नी म्हणते पती पासवर्ड का सागंत नाही ?
*नाजनीन शेख*
जळगाव | प्रतिनिधी
अनेक दांपत्याचे संसार मोडण्यास मोबाइल कारणीभूत ठरत आहे . पती म्हणतो ,पत्नी सारखी मोबाईलवर बोलते ; तर पत्नी म्हणते , पती मोबाइलला पासवर्ड का लावून ठेवतात . ते पासवर्ड का सांगत नाही ? असे गाऱ्हाणे महिला दक्षता समितीच्या चर्चेतील दांपत्याला वादातून समोर येत आहे.
अनेक कारणांमुळे  समाजात घटस्फोटांचे प्रमाण वाढत आहे . पती – पत्नीच्या वादाची दखल समितीतर्फे घेण्यात येते. महिलांना काही त्रास असल्यास त्या यासमिती आपली व्यथा रितसर मांडतात. याबाबत समितीतर्फे पुढील कार्यवाही केली जाते. छोट्या – मोठया  कारणांवरून तुटणारे संसार पुन्हा जुळण्यासाठी या समितीतर्फे त्या जोडप्यांचे समुपदेशन करून त्यांच्या मनोमिलनावर भर दिला जातो. जेणे करून त्यांच्या संसाराची वेल पुन्हा बहरेल. काही दांपत्यांना मुलं असतात. यासमितीमार्फत दाम्पत्यांचे मनोमिलन झाल्यानंतर त्यांच्या मुलांना पुन्हा मातृ-पितृ प्रेम मिळते. अन्यथा दांपत्याचा घटस्फोट झाल्यास ही मुले आई – वडिलांच्या प्रेमाला पारखे होऊ शकतात . त्यामुळे यासमितीचे अधिकारी ,कर्मचारी ,पदाधिकारी त्या दांपत्यांच्या संसारातील अडचणी ,संशय कल्लोळ ,त्यांच्यातील गैरसमज दूर करण्यासाठी प्रयन्तशील असतात.

उर्वरित बातमी उद्याच्या अंकात….

Leave A Reply

Your email address will not be published.