राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेसाठी जळगावचा संघ घोषित

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

७ नोव्हेंबर पासून पुणे पिंपरी येथे होत असलेल्या राज्यस्तरीय आंतरजिल्हा पुरुष खुला गट हॉकी स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्याचा हॉकीच्या संघाची अंतिम निवड हॉकी जळगावचे सचिव फारुक शेख यांनी घोषित केली.

या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी जळगाव शहरातील नामांकित फिजिशियन डॉक्टर सुयोग चौधरी, महावीर क्लासेसचे नंदलाल गादिया, बास्केटबॉल खेळाचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक वाल्मीक पाटील व फुटबॉलचे एन आय एस कोच अब्दुल मोहसिन आदींची उपस्थिती होती.

जिल्हा हॉकी संघास यांचे मिळाले सहकार्य

महाविर क्लासेस जळगावचे नंदलाल गादिया, न्यू मंगल मूर्ती हॉस्पिटलचे डॉक्टर सुयोग चौधरी, चितळे समूह पुण्याचे गिरीश जी चितळे, कुंटे अकॅडमी पुण्याचे अभिजीत कुंटे, जळगाव स्पोर्टस हाऊस चे ॲडव्होकेट आमिर शेख, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित,क्रीडा संकुल चे प्रशिक्षक अरविंद खांडेकर यांनी संघाला सहकार्य दिले आहे

जळगाव जिल्ह्याचा अंतिम संघ खालील प्रमाणे

इम्रान शेख, अवेज़ खाटीक,शोएब भिस्ती, मुझफ्फर शेख, मीरान शेख, राहुल धुलंकर, शारीक सैय्यद , सत्यनारायण पवार (सर्व जळगाव), शादाब सय्यद (जळगाव पोलीस), आरिफ कुरेशी, मोहसिन शेख, रियाज़ कुरेशी, साहिल पटेल, अकबर खान , तौसीफ कुरेशी, सुलेमान शेख,फ़राज़ तड़वी, नदीम कुरेशी (सर्व भुसावल)

संघ प्रशिक्षक म्हणून लियाक़त अली सैयद भुसावळ तर संघ व्यवस्थापक म्हणून मजाज़ खान जळगाव यांची निवड करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.