Diwali 2021: जाणून घ्या.. भाऊबीज सणाची संपूर्ण माहिती, महत्व आणि पौराणिक कथा

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

दिवाळी हा सण आला म्हणजे आपल्या बहिणीला किंवा सासरी गेलेल्या मुलीला आपल्या घरी दिवाळीला आणण्याची परंपरा असते. म्हणून बहीण भाऊ यांचा सण म्हणजेच भाऊबीज. भाऊबीज हिंदूधर्मीय आहे.

या दिवशी बहिणीच्या किंवा स्वतःच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. मग भाऊ ताटात ओवाळणी देऊन बहिणीचा सत्कार करत असतो. काही समाजाचे लोक या दिवशी चित्रगुप्ताच्या देवळात जाऊन चित्रगुप्ताची पूजा करतात.

या दिवशी यमराजाने आपली बहिण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रालंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले. म्हणून हा दिवस यमद्वितीया म्हणून साजरा केला जातो. या दिवशी नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते. असे केल्याने त्याला त्यावर्षी यमापासून भय नसते असा समज आहे. यम आणि यमी या भावा-बहिणीच्या प्रेमाबद्दल हा दिवस साजरा केला जातो.

भाऊबीज हा सण संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो तसेच हा सण रक्षाबंधन इतकाच महत्त्वाचा सण आहे. भाऊबिजेचा हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. उत्तर भारतात, नेपाळमध्ये भाई दूज आणि भाई टीका असेही म्हणतात. या सणाला हे नाव नेमले गेले. त्याचे महत्त्वही तसेच आहे. म्हणजेच बंधू-भगिनी मधील श्वासात बंधन करणारा हा सण आहे. हा सण भावाच्या दीर्घायुष्या -साठी व त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करणारा दिवस आहेत.

भाऊबीज सणाचे महत्व:

भाऊबीज साजरा करण्यामागे आपल्या दोन बहीण आणि भावाचे प्रेमाचे महत्त्व आपल्याला येथे दिसून येते. कार्तिक शुद्ध द्वितीया भाऊबीज हा सण साजरा केला जातो. बहिण आपल्या भावाला ओवाळून त्याच्या दिर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते. हा दिवस म्हणजे शरद ऋतूतील कार्तिक मासातील द्वितीया. द्वितीया चंद्र, आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे. तेव्हा बीजेच्या कोरीप्रमाणे बंधू प्रेमाचे वर्णन होत राहो ही त्यामागची भूमिका आहे.

आपल्या मनातील द्वेष निघून सर्वत्र बंधू भावनेची कल्पना जागृत होते. म्हणून त्याकरिता भाऊबीजेचा हा सण साजरा केला जातो. बंधू-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. ज्या समाजात भगिनींना समाजातील व राष्ट्रातील पुरुष वर्ग भगिनी समजून त्यांच्या रक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांना अभय देतील व त्यामुळे त्या समाजात निर्भयतेने फिरू शकतील. तो दिवस म्हणजे दीपावलीतील भाऊबीज पूजनाचा दिवस असतो.

या दिवशी असे म्हणतात, की स्त्रियांमध्ये देवीतत्त्व जागृत होतं. अशा परिस्थितीत बहिणीच्या सानिध्यात राहण्याने तिच्या हाताने बनवलेले पदार्थ खाल्ल्याने आणि तिच्याकडून ओढवून घेतल्याने भावाला व्यवहारिक आणि आध्यात्मिक लाभ प्राप्त होतो. तसेच एखाद्या कोणत्या कारणामुळे बहिणीला कोणी भाऊ भेटलाच नाही, तर ती चंद्राला भाऊ समजून ओवाळते. भावा-बहिणीने एकमेकांची आठवण ठेवावी विचारपूस करावी एकमेकांवर प्रेम करावे यासाठी हे आपल्याला महत्त्व दिसून येते.

भाऊबीज कशी साजरी करतात:

भाऊबीजेच्या दिवशी भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जातो. त्या दिवशी बहिणीने वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ जसे की लाडू, करंजी, गुलाबजामून, चकली, चिवडा हे सर्व दिवाळीसाठी केलीच असतात. त्या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी गेल्यानंतर संध्याकाळी एका पाटावर बसवून दिवा, हळद-कुंकू, अक्षदा यांनी सजवलेले ताट घेऊन आधी चंद्राला व नंतर आपल्या भावाला ओवाळते व दहीभाताचा नैवद्द चंद्राला दाखविला जातो.

आपल्या भावाला गोड पदार्थांचे जेवण वाढते. अशा प्रकारे हा सण मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा करतात. भाऊबीज म्हणजे बहिण भावाच्या प्रेमळ नात्याचा उत्सव असतो. दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज हा सण असतो. भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याची पूजा करत असते. भावाची पाषाणापासून म्हणजेच मृत्यू पासून सुटका व्हावी व दीर्घायुषी व्हावा यामागे हा खरा उद्देश असतो.

भाऊ आपल्या यशाशक्ती प्रमाणे पैसे, कापड, दागिने अशा विविध वस्तू देत असतो. या दिवशी सख्खा किंवा दूरचा भाऊ नसल्यास चंद्राला सुद्धा ओवाळण्याची पद्धत आहे. अशाप्रकारे बहिण-भावाचा हा भाऊबीज सण महिला खूप मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करतात.

भाऊबीज साजरी करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असल्या तरी यामध्ये आपली बहीण भावाला ओवाळत असते. या दिवशी भावाला तेल उटणे लावून अंघोळ घालतात. बहिणी भावाच्या आवडीचे सर्व पदार्थ तयार करतात. एखाद्या स्त्रीला भाऊ नसेल तर ती चंद्राला आपला भाऊ म्हणून ओवाळते.

भावाने बहिणीकडे जाऊन बहिणीने भावाला ओवाळावे तसेच भाऊबीजेच्या दिवशी कुठल्याही पुरुषाने स्वतःच्या घरी पत्नीच्या हातचे अन्न खायचे नसते, त्याने बहिणीच्या घरी जावे आणि तिला वस्त्रालंकार वगैरे देऊन तिच्या घरी भोजन करावे. सख्खी बहीण नसली तर कोणत्याही बहिणीकडे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीला भगिनी मानून तिच्याकडे जेवावे असे सांगितले जाते.

भारतात तसेच हिंदू धर्मातील सर्व बहिणी, महिला भाऊबीज साजरी करत असतात. यामध्ये त्यांना एक वेगळाच आनंद मिळतो. भाऊबीजेला बहिणीने भावाला टिळा लावून त्याला ओवाळणी करत असतात. त्यानंतर बहिणी भावाच्या हाताला लाल धागा बांधतात व नंतर काही गोड खायला देतात. अशा प्रकारे बहिण-भावाचा हा प्रेमळ सण साजरा केला जातो.

भाऊबीज विषयी पौराणिक कथा:

भाऊबीज विषयी एक यम आणि त्याची बहीण यमी या दोन बहिण भावाची एक कथा प्रचलीत आहे. यमद्वितीया यमराज आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला जातो. त्यामुळे त्या दिवशी नरकात खितपत पडलेल्या जीवांना त्या दिवसापुरते मोकळे करतो. त्यामुळे भाऊबीजेला एक वेगळेच महत्त्व आलेला आहे. एखाद्या स्त्रीला भाऊ नसेल तर तिने कोणत्याही पुरुषाला आपला भाऊ मानून ती त्याला ओवाळते. ते शक्य नसल्यास चंद्राला भाऊ मानून ओवाळण्याची पद्धत आहे.

अपमृत्यु येऊ नये म्हणून धनत्रयोदशी, नरक चतुर्थी आणि मृत्यूची देवता यम याचे पूजन करून त्याच्या चौदा दिव्यानी तर्पण करण्यास सांगितले आहे, असे केल्यास अपमृत्यु येत नाही. म्हणून बहिण या दिवशी आपल्या भावाला आपल्या घरी बोलावून स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून गोडधोड पदार्थ करून त्याला ओवाळूनी केल्यानंतर जेवू घालते व देवाकडे प्रार्थना करते की, माझ्या भावाला सर्व संकटांपासून तसेच यमापासून कोणतीही भय राहू देत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.