राज्यमंत्री ना .बच्चुभाऊ कडु यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन

0

भुसावळ , प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्य प्रहार जनशक्ती पक्ष सलंग्नित प्रहार शैक्षणिक व सामाजिक बहुउद्देशिय  संघटनेतर्फे नामदार राज्यमंत्री बच्चुभाऊ कडु यांच्या  वाढदिवसानिमित्त ३० जुन ते ५ जुलै हा “समाजहित- समाजभान ” हा सप्ताह साजरा करण्यात येत आहे.  या अंतर्गत  समाजहित  जोपासण्याकरिता  विकासदादा घुगे , कृष्णांत दादा गायकवाड, कृष्णादादा  बोदेले,  यांच्या  मार्गदर्शनाखाली  व सौ राजश्री नेवे यांच्या सौजन्याने  जिल्ह्यात विविध उपक्रम घेण्यात येत आहे.

या सप्ताहातंर्गत दिनांक 3 जुलै शनिवार रोजी सकाळी ११ ते २ या दरम्यान  मोफत नेत्र तपासणी शिबीर घेण्यात येत आहे .  स्थानिक ब्राम्हण संघाजवळ नेत्रम आय हॉस्पिटल येथे आयोजित या शिबिरात तज्ञ डॉक्टर  नेत्र तपासणी करणार असून कोविड १९ च्या पार्श्वभूमिवर त्रीसूत्री नियमांचे काटेकोर  पालन करण्यात येणार आहे , तरी जास्तीत जास्त गरजूनीं शिबिराचा लाभ  घ्यावा असे आवाहन प्रहार शैक्षणिक व सामाजिक बहुउद्देशिय  संघटना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौ राजेश्री उमेश नेवे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.