राजकारणात अडलय सिंचन

0

जळगाव | प्रतिनिधी 
जिल्ह्यात सिंचन प्रकल्प करताना जिल्ह्याचे तापी पट्टा आणि गिरणा पट्टा अशी हेतुपुरस्सर फूट पडली की पाडली. केळी विरुद्ध कापूस संघर्ष उभा राहिला. आणि राजकारणात सिंचन अडकले. रावेर (जळगाव पूर्व ) विरुद्ध जळगाव ( पश्चिम) वाद उभा राहिला. या वादाला भाजप – राष्ट्रवादी दोघंही जबाबदार आहे.
सिंचन विभाग 10 भाजपकडे,15 वर्षे राष्ट्रवादी होता. पूर्व भागात सिंचन तापी कुर्‍हा बडोदा, वरणगाव ,बोदवड उपसा , वाघूर उभे राहिले काय अवस्था आहे. पाणी आहे तर उपसा नाही. कॅनॉल नाही ? पाणी अडले किती, किती शेतकर्‍यांना फायदा झाला? पश्चिम भागात शेळगाव, पाडळसे, वरखेड, 7 बलून बंधार्‍यांना न्याय मिळाला नाही.
* पाणी अडवले जाणार, पण सिंचनाचे काय?
* सध्या सिंचनाची अवस्था अशी आहे.
* पूर्व भागासाठी 5000 हजार कोटी ची मेगा रिचार्ज योजना
* फक्त कागदावर
* शेळगाव प्रकल्प – 200 कोटींचा होता. तो 970 कोटीवर फक्त टक्के 33 टक्के झाला.
* पाडळसरे प्रकल्प 27 कोटींचा होता. तो 2700 कोटीवर गेला. पूर्ण झाला तरी कॅनॉल नाही ना उपसा नाही पाणी देणार कसे?
* गिरणा प्रकल्प – वरखेड 400 कोटींचा आहे. पण पाणी वाटप काय? पुढील 20 वर्ष ना कालवा निघणार. ना बंद पाइपलाइन, योजनेचा मग उपयोग काय?
* 7 बलून बंधारे फक्त कागदावर, त्यासाठी उपशाला परवानगी नाही. डीपीआर 4 वेळा निघाले पुढे काय झाले?
जिल्ह्यातील भौगोलिक रचना पहिली तर तापी गिरणा या दोन्ही नद्यांमध्ये पाणी अडवले आहे. पण काठावरची गावे वगळता सिंचन होऊच शकत नाही. तापी नदी खच दरीतून वाहते. जमिनीपासून 100 मीटर खोल, यात पाणी अडेल पण शेतकर्‍यांना पाणी देण्यासाठी कालवे काढता येण शक्य नाही. उपशाला मंजुरी मिळत 20 वर्ष म्हणजे आणखी एक पिढी जाईल. तापी पश्चिम वाहिनी आहे. आणि तिचा पाण्याचा भूगर्भातील प्रवास फक्त पुर्व भागात आहे. त्यामुळे रावेर चोपडा, शिरपूर यावल या काठावरची गावातील जमिनीत पाणी येईल. पण पश्चिमेकडील अमळनेर, जळगाव ग्रामीण, शिंदखेडा, धुळे या भागाला जमिनी खाली पाणी देखील झिरपणार नाही. तसेच कालवे शक्य नाही, उपासा कधी होणार? तापी नदीवरील सर्व प्रकल्पात पाणी अडवणे हाच हेतू राहील. पुढे हे सर्व प्रकल्प औद्योगिक आणि पिण्याच्या पाण्यासाठी असतील. याचे उत्तम उदाहरण म्हणजे शिरपूर सुलवडे आणि प्रकाशा बॅरेज होय. मग सिंचनाच काय? असा प्रश्न उपस्थित होतो.
हिच अवस्था वरखेड प्रकल्प, 7 बलून बंधार्‍यांची होईल. शहर आणि गावांना पिण्याचे पाणी आणि उद्योगाला पाणी वगळता या योजनांचा उपयोग किती? काठावरील गावे आजही बागायती आहेत. उद्याही बागायती राहतील, जे स्वप्न दुष्काळी भागाला पाणी मिळेल असे दाखवले जातेय, त्यांना पाणी मिळेल का? याचे उत्तर कोणीतरी छातीठोक हो म्हणून सांगून दाखवावे.
* तापी महामंडळ 1998 घटना निर्मिती
* 325 टीएमसी पाणी दाखवण्यात आला.
* पण जलायोगानुसार 191 टक्के पाणी आहे.
* पाणी नसताना योजना का आणि कोणाच्या फायद्यासाठी राबवल्या ?
*आजही पाणी प्रमाणपत्र नसलेल्या कुर्‍हा- वदोडा , धरणगाव तळवेल, पद्मालय प्रकल्पाची अवस्था उपलब्धता काय?
* मुंडखेडा कॅनॉल का नाही केला?
* कोदगाव , दरेंगाव ची अवस्था काय ?
* गिरणा आणि मन्याड चे कालवे का दुरूस्त झाले नाहीत?

Leave A Reply

Your email address will not be published.