खडक्याच्या सेवानिवृत्त शिक्षिकेचा हृदयविकाराने मृत्यू

0

भुसावळ | प्रतिनिधी
तालुक्यातील खडका येथील धांडेवाडा भागातील ७८ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षिकेचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली. सुलभा सुधाकर चोपडे (७८, धांडेवाडा, खडका, ता.भुसावळ) असे मयत वृद्धेचे नाव आहे. चोपडे यांचा मुलगा मुंबईत नोकरीस असून त्या एकट्याच खडका येथे राहत होत्या. शनिवारी रात्री त्या जेवण करून कॉटवर झोपल्या असताना आठ वाजेच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला व त्या जमिनीवर पडल्याने त्यांच्या तोंडातून रक्तस्त्राव झाला.सकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर रहिवाशांनी तालुका पोलिसांना माहिती कळवली.

उर्वरित बातमी वाचा उद्याच्या अंकात…..

Leave A Reply

Your email address will not be published.