राका पॅटर्न सगळीकडे राबवावा – प्रा.सुरेश पांडे

0
बोदवड – येथील न.ह.रांका हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे शुक्रवार दिनांक 20 डिसेंबर रोजी ज्ञानवर्धिनी प्रश्नमंजुषा व गुणगौरव समारंभ आयोजित केला होता.९७९ विद्यार्थ्यांनी दोन गटात दिलेल्या परीक्षांमधील टॉप १०/१० निवडण्यात आले.व अतिथींसमोर त्यांच्या प्रश्नमंजुषा हा स्पर्धात्मक कार्यक्रम झाला यात प्रथम गटात (५ वी ते ८)  प्रथम गुंजन मुकेश कपले,द्वितीय विपुल प्रवीण पाटील,तृतीय मिताली ज्ञानदेव येवले यांचा आला.तर द्वितीय गटात प्रथम क्रं.कुमारी निर्मिती दीपक चौधरी,
व्दितीय क्रंमाक कु.भावना ज्ञानेश्वर चौधरी,तर तृतीय क्रमांक तन्मय विजय काळबैले यांचा आला.
दोन्ही गटातील प्रथम,व्दितीय तृतीय येणाऱ्या विजेत्यांना रोख ५०००,३०००,२००० हजार रुपये,ट्रॉफी,पुस्तक बक्षीस म्हणून देण्यात आले.यासाठी सहयोग सी.ए.प्रणय अग्रवाल
माजी विद्यार्थी राजेश पालवे, योगेश बरडिया,कैलास जावरे, डॉ.यशपाल बडगुजर,उमेश गुरव, अँड.प्रकाशजी सुराणा क्रिडा शिक्षक आर.के.तायडे,ग्रंथपाल व्ही.व्ही.पाटील,माजी विद्यार्थी राजेश नानवाणी यांचा लाभला. परीक्षेसाठी व्हाचेअरमन अजय जैन यांनी एक हजार पुस्तके मोफत दिली त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
जळगाव येथील प्रा.सुरेश पांडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की स्पर्धा परीक्षा अधिकारी होऊन समाजसेवा करण्याचा राजमार्ग आहे.
 त्यासाठी आपल्या मातृभाषे बरोबरच इंग्रजी भाषेचा अभ्यास करता आला पाहिजे.त्यासाठी या शाळेचा ज्ञानवर्धिनी हा उपक्रम आहे व माझी इच्छा आहे की सर्व शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाऊन त्याची ‘राका पॅटर्न’ अशी ओळख व्हावी.तसेच जळगाव जिल्ह्यातील तालुक्यांची नावे लक्षात ठेवण्यासाठी क्लृप्ती सांगीतली.
आपल्या ५० मिनिटांच्या मनोरंजनात्मक मनोगतात त्यांनी मनोरंजनासोबत ज्ञानदान ही केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मिठूलालजी अग्रवाल यांनी हा उपक्रम व्यापक करण्यावर भर दिला तर माजी चेअरमन प्रकाशचंदजी सुराणा यांनी प्रेरणादायी पुस्तके माणसाला घडवितात हे सांगून ज्ञानवर्धिनी हा उपक्रम विद्यार्थ्यांना आवडतो हे विद्यार्थी संख्येवरुन समजते असे सांगितले.सचिव विकासजी कोटेचा यांनी भारताचा निती आयोग व त्याची महाराष्ट्राचे स्थान याविषयी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीतील स्वागतनृत्य तर आभाररात भाऊ-बहीण यांचे ऋणगीत हे वेगळेपण नृत्यातून सादर केले.याच्यातून सर्व श्रोत्यांचे डोळे पाणावले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.व्ही.बी.सिसोदे प्रश्नमंजुषा सचिन सत्रे,अतुल पाटील,बक्षीस वितरण संचलन निशांत महाजन प्रास्ताविक उपमुख्याध्यापक एन.ए.पाटील सर यांनी केले. प्रसंगी परीक्षा प्रमुख अनिल कोल्हे यांना ज्ञानवर्धक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.परिक्षेसाठी सहाय्यक एस.के.राणे सर हे होते.
याप्रसंगी व्हा.चेअरमन अजयजी जैन,सचिव विकास कोटेचा, माजी चेअरमन प्रकाशचंदजी सुराणा,संचालक श्री.श्रीराम बडगुजर,आनंद जैस्वाल,रवींद्र माटे,मुख्याध्यापक आर.जे.बडगुजर तसेच विजेत्या स्पर्धकांचे पालक व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
यासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षिका तथा शिक्षकेतर कर्मचारी बंधु व भगिनी यांचे सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.