मीण व शेती विकासासाठी जीवशास्त्र संशोधनाचे योगदान मोलाचे – डॉ.ए.बी.चौधरी

0
बोदवड – ग्रामीण व शेती विकासासाठी जीवशास्त्र संशोधनाचे योगदान मोलाचे असून देशातील शेतीचा सर्वागीण विकास झाल्यास खऱ्या अर्थाने देश सुजलाम व सक्षम होईल त्यासाठी जिवंशास्त्र व जीवतंत्रज्ञान परिश्रम घेईल असे प्रतिपादन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.ए.बी. चौधरी यांनी विज्ञान कॉग्रेस प्रायोजित
कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बोदवड आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या उदघाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.विश्वास चव्हाण (डेन्मार्क),डॉ.के.बी.पाटील (व्हा. चेअरमन जैन इरिगेशन),डॉ.अतुल बोडके (दर्यापूर),डॉ.वायकर (अधिष्ठाता औरंगाबाद),डॉ.रोठे (अकोला)डॉ.पी.एस.लोहार (चोपडा),डॉ.कुमावत,डॉ.अनिल पाटील,डॉ.चिखलीकर,डॉ.गौरी राणे,डॉ.कळसे उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी प्राचार्य अरविंद चौधरी होते.
परिषदेत मुख्य व्याख्याते डॉ. विश्वास चव्हाण (डेन्मार्क) यांनी आपल्या मनोगतात जीवशास्त्र व जीवतंत्रज्ञान विद्याशाखेचे जागतीक स्तरावरील संशोधन कार्य व विविध देशाचा झालेला विकास याचा आढावा घेऊन भारतातील ग्रामीण विकासातील समस्या व शेतीक्षेत्रातील आव्हाने विषद करून जीवतंत्रज्ञान क्षेत्रातील मेहनत व आधुनिक सुविधाचा वापर कसा करावा यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
देशातील शेतीविकासासाठी शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते,औषधे,पाणी,वीज, आधुनिक अवजारे,भाडवल व जीवतंत्रज्ञान सहकार्य प्राप्त झाल्यास शेतीविकास व ग्रामीण विकास सहज शक्य असल्याचा विश्वास प्राचार्य अरविद चौधरी यांनी अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केला.
सदर परिषदेत गुजरात,मध्यप्रदेश,कर्नाटक व महाराष्ट्र असे देशभरातून एकूण १७७ सहभागी उपस्थित होते. दिवसभरात ६५ संशोधकांनी संशोधन लेख व ७० भित्तीपत्रकावर चर्चा केली.
प्रास्ताविक परिषद सचिव डॉ. चेतन शर्मा यांनी केले सूत्रसंचालन प्रा.नरेंद्र जोशी तर आभार डॉ. गीता पाटील यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपप्राचार्य प्रा.देवसिंग पाटील,प्रा. कांचन दमाडे,प्रा.विशाल जोशी, डॉ.अनिल बारी,डॉ.म्हसलेकर,प्रा. सावडेकर,श्री.विजय बडगुजर, श्री.हिवराळे यांचेसह सर्वानी मेहनत घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.