परीक्षेला सामोरे जा आत्मविश्वासाने या विषयावर कार्यशाळेचे आयोजन

0
 भुसावळ (प्रतिनिधी)-
मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा स्थानिक केंद्र जळगाव व भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थी व पालकांसाठी रविवारी 22 डिसेंबरला भुसावळ व जळगाव  येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यशाळेमध्ये सोपी अभ्यास पद्धति, मेंदू व्यायाम व मन एकाग्रता मंत्र, सकारात्मक मनस्थिती ठेवण्याचे तंत्र, परीक्षेला जाताना आवश्यक नऊ सूचना यासह  इतर विषयांवर ती विद्यार्थी व त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे
सकाळी बी व्ही खाचणे हॉल भुसावळ येथे  10 वाजता तर दुपारी चार वाजेला जळगाव येथील सरदार वल्लभाई पटेल लेवा भवन बीएसएनएल ऑफिस मागे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे
या कार्यशाळेला जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मनशक्ती प्रयोग केंद्र यांच्या वतीने करण्यात आले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.