युवा प्रेरणा फाउंडेशनतर्फे आयुष्यमान भारत स्मार्ट कार्ड नोंदणी उपक्रम

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

आज भारतीय जनता पक्ष मंडल क्र 7 च्या मध्ये युवा प्रेरणा फाउंडेशनच्या  माध्यमातून पंडित दिनदयाल उपाध्यय  यांच्या जयंतीनिमित्त आयुष्यमान भारत या स्मार्ट कार्ड नोंदणी व बनवुन देणे या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

प्रथम पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पुष्प अर्पण करण्यात आले.  याप्रसंगी जळगाव जिल्हा महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, सरचिटणीस डॉ. राधेश्याम चौधरी, सरचिटणीस नितीन इंगळे, मंडळ अध्यक्ष संजय लुल्ला, सरचिटणीस सुनील काळे, अनिल जोशी, प्रभाग समिती सदस्य, प्राध्यापक भगतसिंग निकम सर ,युवा प्रेरणा फाउंडेशनचे अध्यक्ष विकी सोनार, प्रकाश जाधव, कैलास साळुंके, राजेश्वर जोशी, दीपक जोशी, राहुल जोशी, प्रतीक शेठ अग्रवाल, प्रसन्न बागुल, यांची उपस्थिती होती.

यादीत असलेल्या आयुष्यमान भारत या नोंदणीसाठी परिसरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला व जवळपास 125 ते 150 लोकांची नाव नोंदणी याप्रसंगी करण्यात आली.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विकी सोनार, पराग जोशी, राजेश्वर जोशी, यांनी मोलाचे सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.