या मूर्खाला खासदार असून इतकी सुद्धा अक्कल नाही ; निलेश राणेंचा संजय राऊतांवर टोला

0

मुंबई | कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचे काम ताबडतोब थांबवा, परिस्थिती जैसे थे ठेवा, असे आदेश उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला दिले आहेत. कोर्टाचा हा निर्णय राज्य सरकारसाठी मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे. या निर्णयानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हा निर्णय दुर्दैवी असल्याचं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. ही जमिन महाराष्ट्राची, सरकार महाराष्ट्राचं, मग हे मिठागरवाले आले कुठून? असा सवाल देखील संजय राऊत यांनी विचारला आहे.

 

तसेच अशा प्रकारच्या प्रकल्पाला विलंब होईल अशी परिस्थिती निर्माण करायची, लोकांमध्ये रोष निर्माण करायचा आणि सरकारला बदमान करायचं, हे काम सध्या सुरु आहे,’ अशी टीका संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे.

 

यावरून आता भाजप नेते निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. ‘संज्या राऊत म्हणतो कांजूर कारशेडच्या विषयात न्यायालयाने पडू नये. न्याययाचिका दाखल केल्यानंतर न्यायालय आपलं म्हणणं किंवा आपला निर्णय देतात. या मूर्खाला खासदार असून इतकी सुद्धा अक्कल नाही की कोण न्यायालयात गेल्याशिवाय स्वतःहून न्यायालय निर्णय देत नाही’. असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला होता. राज्य सरकारने एकही रुपया न घेता ही जागा MMRDA ला दिल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र, आता केंद्र सरकारने या जागेत मिठागार असल्याचे सांगत त्यावर आपला हक्क सांगितला आहे. केंद्राच्या उद्योग संवर्धन आणि व्यापार मंत्रालयाने राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात कांजूरमार्गची जागा MMRDA ला देण्याचा निर्णय रद्द करा. ही जागा मिठागराची आहे. आम्ही त्यावरील आमचा हक्क सोडलेला नाही, असे नमूद करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.