यावल येथे महाराष्ट्र बंदला समिश्र प्रतिसाद

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

महाविकास आघाडीच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी विरोधी केंद्र सरकारच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदच्या हाकेला व्यापारी व व्यवसायिकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.

महाविकास आघाडीच्या वतीने दि. ११ ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशातील लखीमपुर खिरी  या गावातील शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून र्निदयीपणे मारण्याचा प्रकार हा अत्यंत निंदनीय व तीव्र चिड आणणारे  आहे. आपला भारत देश हा कृषी प्रधान देश असतांना या देशांमध्ये आपलेच शेतकरी गेली अनेक महिन्यापासुन केंद्र शासनाने मंजुर केलेल्या काळया कायद्याच्या विरोधात आपल्या न्याय हक्कासाठी  केंद्रातील मोदी सरकारकडे शांततेत आंदोलन करून लोकशाही मार्गाने आपले म्हणणे सरकार पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहे.

असे असतांना वेळोवेळी हे आंदोलन भारतीय जनता पक्षाचे केंद्रातील  सरकारच्या माध्यमातुन दाबण्याचा व आंदोलनास भटकण्याचा  प्रयत्न करण्यात येत आहे. पंरतु यामध्ये भारतीय जनता पक्षाला पुर्णत: यश आलेले नाहीत. शेतकरी आंदोलन साम, दाम, दंड, भेद वापरून देखील संपत नसल्यामुळे दहशतीद्वारे शेतकऱ्यांना संपविण्याचा घाट आता भाजपा  सरकारने चालविला आहे.

अशा वेळी महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाणे गरजेचे असून या निर्देयी कृत्याचा निषेध म्हणून  दि. ११ ऑक्टोबर सोमवार रोजी महाराष्ट्र बंद पाळण्यात याकरिता महाविकास आघाडीच्या वतीने  आमदार शिरीष चौधरी यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना यांच्यातर्फे बंदचे आवाहन प्रभाकर आप्पा सोनवणे, गटनेता जिल्हा परिषद जळगांव तथा तालुकाध्यक्ष काँग्रेस प्रा. मुकेश येवले सर(नगरसेवक तथा तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी ),रविन्द्र सोनवणे तालुका प्रमुख शिवसेना , पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील , कृउबाचे माजी संचालक दिनकर पाटील , रIष्ट्रवादीचे अॅड देवकांत पाटील, बोदडे नाना, हितेश गजरे , राहुल चौधरी , भैय्या पाटील , अॅड निवृत्ती पाटील , निवृत्ती धांडे , अय्युब रवान , नानासिंग बारेला, प्रमोद पाटील , डॉ . हेमंत येवले , गनी भाई , कामराज घारू, व्दारका पाटील , श्यामल भावसार , नरेन्द्र शिंदे , अ .करीम मन्यार, काँग्रेसच्या वतीने भगतसिंग पाटील , कदीर खान , हाजी गफ्फार शाह, अनिल जंजाळे , नईम शेख , विवेक सोनार , बशीर तडवी , विनोद पाटील , अमोल भिरूड , चंद्रकलाताई इंगळे, पुंडलीक बारी , हाजी अय्याज खान, सद्दाम शाह यांनी तर शिवसेनेच्या वतीने सेनेचे शहरमुख जगदीश कवडीवाले, सुनिल बारी , माजी तालुकाप्रमुख कडु पाटील , संतोष खर्चे , पप्पु जोशी, अजहर खाटीक यांच्यासह महाविकास आघाडीतील आदी पदधीकाऱ्यानी यात सहभाग घेतता . यावेळी यावल शहरातुन महाविकास आघाडीने पुकारलेल्या या महाराष्ट्र बंदच्या हाकेला तालुक्यातुन समिश्र प्रतिसाद मिळाला.

Leave A Reply

Your email address will not be published.