मोहम्मद शमीच्या कारचा अपघात, डोक्याला दुखापत

0

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या कारचा अपघात झाला असून हा अपघात देहराडून येथून दिल्लीला येताना झाला आहे. शमी यामध्ये जखमी झाला असून त्याच्या डोक्याला १० टाके पडले आहेत. त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद शमी देहराडूनमध्ये क्रिकेट अकादमीच्या कामासाठी होता. आज पहाटे तो तेथून दिल्लीला परतत असताना रस्त्यात एका भरधाव ट्रकने शमीच्या कारला धडक दिली. शमीच्या डोक्याला या अपघातात दुखापत झाली असून, त्याला दहा टाके पडले आहेत. सध्या शमीची प्रकृती स्थिर असून तो डेहराडूनमध्ये विश्रांती घेत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.